शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती व्हावी :  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:12 IST

रस्ते बांधकामात खूप समस्या येतात. यामुळे कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी रोड प्रीकास्टमध्ये फ्लाय अ‍ॅॅशचा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनासही वाव मिळेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे१० व्या प्रादेशिक ग्रीह परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते बांधकामात खूप समस्या येतात. यामुळे कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी रोड प्रीकास्टमध्ये फ्लाय अ‍ॅॅशचा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनासही वाव मिळेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रीह कौन्सिल, तसेच द एनजी रिसर्च इन्स्टिटयूट (टेरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या रिजनल ग्रीह कौन्सिलचे उद्घाटन शुक्रवारी नागपुरातील एका हॉटेलमध्ये गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिल सगणे, ग्रीह कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ उपास्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, हरित वास्तु निर्मितीमध्ये बांधकाम खर्च कमी करण्यासाठी व वास्तू आर्थिकदृष्ट्या किफायतशीर राहण्यासाठी अभियत्यांनी चाकोरीबाहेर विचार करून नवकल्पनांचा वापर करावा. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे रस्त्यांच्या कामात तलाव नाले यांच्या खोलीकरणातून मिळालेली माती, व इतर सामग्री वापरली जात आहे, यामुळे जलसंधारण होऊन रस्तेप्रकल्प खर्चात बचत होत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणीतून मिळणारी वाळू स्वस्त दरात जनसामान्यांना उपलब्ध करून दिली जात असल्याने बांधकाम खर्चात कपात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सांडपाणी, भाजीपाला, फळे यांच्या टाकाऊ सामग्रीतून बायोडायजेस्टर व्दारे बायो.सीएनजी. निर्मितीचा प्रकल्प आता पूर्व विदर्भातील जिल्ह्यात सुरू होणार असून नागपुरात बायो-सीएनजीवर संचालित बसेसचेही लोकार्पणही होणार आहे.याप्रसंगी ग्रीह कौन्सिलतर्फे आसित्वात असणाऱ्या इमारतीच्या फाईव्ह स्टार रेटींगचा पुरस्कार पुण्याचे राजभवन, सोलापूरच्या करकंब येथील ग्रामीण रुग्णालय व वाशिम जिल्हयातील मालेगाव जहांगीरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह या तीन वास्तूंना देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना विशेष योगदानाबद्दल मंत्रिमहोदयांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ग्रीह राईजिंग अवॉर्ड श्रेणी अंतर्गत पुणे नाशिक, कोकण, नागपूर अमरावती असे विभागवार पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करणाºया अभियंत्यांना वितरित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते. याप्रसंगी ग्रीह कौन्सिल व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात पर्यावरण सक्षम बांधकाम संदर्भातील धोरण पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर