शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळ असलेल्या रामटेक बसस्थानकाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:41 IST

ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेले रामटेक बसस्थानक सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा नियमित सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या बसफेऱ्यामुळे प्रवासी त्रस्त रामटेक आगार प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेले रामटेक बसस्थानक सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा नियमित सामना करावा लागत आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे प्रवाशांना बसायला जागा अपुरी पडत आहे. त्यातही रामटेकवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना अनेक हाल सोसावे लागतात, शिवाय अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतु या गंभीर प्रकाराकडे आगार प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.येथील बसस्थानकावर भरउन्हात प्रवासी उभे राहतात. पावसाळा व उन्हाळ्यात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. अनेकदा प्रवासी जाळीजवळच्या पारीवर बसतात. बाजूलाच सुलभ शौचालयाचे गडर चेंबर आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना नाकावर रूमाल ठेवूनच बसावे लागत आहे. बसस्थानकावरील घाण व दुर्गंधीमुळे शेकडो प्रवासी बसस्थानकाबाहेर फिरताना आढळतात. वेळप्रसंगी धावतपळत प्रवाशांना एसटी पकडावी लागते. बसस्थानकाची अशी गंभीर अवस्था असताना आगार प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे याबाबत विद्यार्थी, महिला, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, वयोवृद्ध तसेच इतर प्रवासी बसस्थानकावरील समस्या व होणारी गैरसोय याबाबत आगार प्रशासनाच्या लक्षात आणून देत तक्रारीही करतात. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.नागपूरला जाणाऱ्या बसेस ज्या फलाटावर थांबतात, त्या बाजूला प्रवासी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना भरउन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात ही बाब एखाद्या प्रवाशाच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे रामटेकवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन प्रवासी निवारा तात्काळ निर्माण करणे गरजेचे आहे.

प्रवाशाच्या तक्रारीला केराची टोपलीबसस्थानकावरील विविध समस्यांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बसण्यासाठी प्रवाशांना जागा शोधावी लागते. या बसस्थानकामध्ये काही तास असे असतात की, प्रवाशांना बसायला जागा न मिळाल्याने तासन्तास उभे राहावे लागते. अपुऱ्या बसफेऱ्या व विविध समस्यांमुळे अनेकदा प्रवासी आगार प्रशासनाकडे तक्रारी करतात. परंतु प्रवाशांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार आगार प्रशासनाकडून होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ