शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील तीव्र पाणीसंकटामुळे वीज उत्पादनाला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 10:53 IST

उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देअगोदरपासूनच सुरू आहे पाणीकपातबैठकीकडे लागले आहे लक्ष

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे. अगोदरपासूनच पाणीकपातीचा सामना करीत असलेल्या कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांचे वीज उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्यावर सद्यस्थितीत मौन साधले आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. जर पाण्याचा पुरवठा कमी झाला तर स्वाभाविकपणे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.‘महाजेनको’ने या केंद्रांसाठी मे महिन्यातच पेंच व तोतलाडोह येथील ‘डेड स्टॉक’मधून पाण्याची मागणी केली होती. १५ जुलैपर्यंतच वीज उत्पादन शक्य होईल, असे दोन्ही केंद्रांनी स्पष्ट केले होते. आता नागपुरात पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर महाजेनकोच्या दोन्ही केंद्रांवर तणाव वाढला आहे. दोन्ही वीज केंद्रांना पेंच व तोतलाडोह येथून पाणी मिळते. मात्र या दोन्ही जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज उत्पादन घटले तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होईल. परंतु राज्यातील इतर भागांमध्ये होत असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.कोराडी व खापरखेडा वीज केंद्रांसाठी प्रशासनाने एकूण ६८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणीसंकटामुळे याला कमी करून ४८ एमएम क्युब करण्यात आले आहे. प्रशासनाने कोराडी औष्णिक वीज केंद्रासाठी ३० तर खापरखेडा वीज केंद्रासाठी ३८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र सद्यस्थितीत पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, कोराडीला २० आणि खापरखेड्याला २८ एमएम क्युब पाणी दिले जात आहे.

आरक्षणाहून कमी पाण्याच्या उपयोगाचा दावादिलेल्या आरक्षणाहून कमी पाण्याचा उपयोग करण्यात येत असल्याचा दावा दोन्ही वीज केंद्रांनी केला आहे. सोबतच खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात दररोज १ लाख २० हजार एम क्युब पाणी रोज साठवले जात आहे. एक लाख एम क्युब पाण्याची मागणी असताना खापरखेड्यात जास्तीत जास्त ७५ हजार एम क्युब पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम क्युब पाण्याची आवश्यकता पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. कॉलनी तसेच प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा राख व्यवस्थापनात परत उपयोग करण्यात येत आहे. यासोबतच कॉलनीमध्ये पाण्याच्या बचतीसाठी सर्व उपाय करण्यात येत आहेत व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई