शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नागपूर महानगरपालिकेतील टॅक्स वसुलीचे आता खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:18 IST

मार्चपूर्वी मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता नाही. यावर कायमस्वरुपी पर्याय म्हणून महावितरण्याच्या धर्तीवर मालमत्ता कर वसुलीसाठी खासगी ‘एजन्सी’ची नियुक्ती करण्याबाबतची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

ठळक मुद्देमनपात प्रस्तावाची तयारी वसुलीच्या आधारावर एजन्सीला मिळणार कमिशन

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर(टॅक्स) विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी. यासाठी शहरातील मालमत्ताचे सर्वेक्षण करण्यात आले. यावर १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. सर्वेक्षणात दीड लाखाहून अधिक मालमत्ता वाढल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यानंतरही वसुलीत अपेक्षित वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत मार्चपूर्वी मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता नाही. यावर कायमस्वरुपी पर्याय म्हणून महावितरण्याच्या धर्तीवर मालमत्ता कर वसुलीसाठी खासगी ‘एजन्सी’ची नियुक्ती करण्याबाबतची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लवकरच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. एजन्सीला मालमत्ता कर वसुलीच्या टक्केवारीच्या आधारावर कमिशन देण्याचा विचार आहे. ७५ टक्केहून अधिक वसुली केल्यास कमिशनची टक्केवारी अधिक राहणार आहे.कर वसुलीसाठी एजन्सीला नेमके किती कमिशन द्यायचे याचा प्रशासनाकडून आराखडा तयार केला जाणार आहे. वित्त वर्ष मार्च २०१९ ला संपत असल्याने या वर्षातील वसुली एजन्सीकडे देणे शक्य नसल्याने एप्रिल २०१९ पासून खासगी एजन्सीकडे मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनीही याला दुजोरा दिला. २०१८-१९ या वर्षात टॅक्स वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु २ नोव्हेंबर पर्यंत जेमतेम ११५ कोटींची वसुली झाली आहे. आठ महिन्यातील ही वसुली आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील चार महिन्यात ३८४ कोटींची वसुली होणे गरजेचे आहे. मात्र खासगी कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेले सर्वेक्षण व त्यात असलेल्या त्रुटी यामुळे नागरिकात संभ्रमाचे वातावरण आहे. चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आल्याची धारणा झाली आहे. कर आकारणीवर आक्षेप घेण्याची संधी उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र अजूनही बहुसंख्य मालमत्ताधारकांना डिमांड मिळालेल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीने कर आकारणीबाबत तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याचा वसुलीला जबर फटका बसला आहे.५.५५ लाख मालमत्तापैकी ४.९३ लाख मालमत्तांचे सर्वेक्षण करून डाटा अपलोड करण्यात आला आहे. यातील ४.३० लाख मालमत्तांचे बिल तयार करण्यात आले आहे. याचे वाटप सुरू होणार आहे. देयकांची एकूण रक्कम ७२२ कोटी आहे. यात ३२० कोटींची थकबाकी आहे.

वाढीव मालमत्ता कुठे गेल्या?मालमत्ता विभागाच्या नोंदीनुसार शहरात ५.५० लाख मालमत्ता आहेत. सायबरटेक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात १.५० लाखाहून अधिक मालमत्ता वाढल्याचा दावा केला जात आहे. त्याुनसार मालमत्तांची संख्या ६.५० ते ७ लाख होणे अपेक्षित होते. मात्र सर्वेक्षणानंतरही मालमत्तात वाढ झालेली नाही. सर्वेणात दर्शविलेल्या वाढीव मालमत्ता गेल्या कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांचा प्रतिसाद नाहीमालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम नियमित भरणारांची संख्या मोठी होती. डिमांड मिळो वा न मिळो, आपल्याकडे थकबाकी नको अशी धारणा असलेल्यांचाही कर भरण्याला प्रतिसाद नाही. कर आकारणीबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती झोन स्तरावरील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका