शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

नागपूरमध्ये वीज क्षेत्राचे खासगीकरण? टोरेंटच्या अर्जावर निर्णय लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:20 IST

परवान्यासाठी अर्ज केला आहे : आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा

कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने मुंबई शहरात समांतर वीज वितरणाच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. नागपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरासाठी टोरेंट पॉवरनेसुद्धा असाच अर्ज केला आहे. हा अर्ज महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर प्रलंबित आहे. परंतु कंपनीला परवाना मिळेल अशी आशा आहे.

टोरेंट पॉवरने २२ नोव्हेंबर रोजी आयोगाकडे अर्ज करून नागपूर शहरासह हिंगणा-बुटीबोरी आणि इतर भागांसाठी वीज वितरणाचा परवाना मिळविण्याची मागणी केली होती. २३ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करून या अर्जावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. टोरेंटने अद्याप आपला अर्ज मागे घेतलेला नाही. कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, आता आयोगाला सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी लागेल आणि त्यांच्या अर्जावर निर्णय घ्यावा लागेल. कंपनी याचीच वाट पाहत आहे. परवाना मिळाल्यानंतर ती काम सुरु करेल. सर्वप्रथम, ती शहराच्या वीज वितरण व्यवस्थेचा अभ्यास करेल आणि आयोगासमोर दर निर्धारण याचिका दाखल करेल. अर्जावरील निर्णयात होणाऱ्या विलंबाबद्दल कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की आयोग त्यांच्या नियमांनुसार काम करतो. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून कंपनी नागपूरकरांना आतापेक्षा स्वस्त वीज देण्याचा प्रयत्न करेल असा त्यांचा दावा आहे. 

आठ वर्षे अनुभवली फ्रँचायसीची, अनुभव होता वाईटटोरेंटला परवाना मिळाल्यावर, नागपूर शहरात वीज क्षेत्राचे खासगीकरण सुरू होईल. तथापि, शहराने या आधीच आठ वर्षांपर्यंत फ्रँचायसीद्वारे वीजपुरवठा अनुभवला आहे. १ मे रोजी शहरातील महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाइन्स या तीन विभागांचे वीज वितरण स्पॅन्कोकडे सोपवण्यात आले. परंतु ही कंपनी एका वर्षातच सुस्त झाली आणि एसएनडीएलने ही जबाबदारी घेतली. जनतेच्या विरोधामुळे महावितरणने त्यांना बाहेरचा मार्ग दाखवला आणि ९ सप्टेंबर २०१९ रोजी पुन्हा ही जबाबदारी स्वीकारली.

इतर शहरांवरही नजरखासगी क्षेत्राचे राज्यातील अनेक शहरांवर लक्ष आहे. टोरेंटने नागपूरमध्ये वीज वितरणासाठी परवाना मागितला आहे. याशिवाय, टाटा पॉवरने पुणे, ठाणे आणि नवी मुंबईसाठी परवाना मागितला आहे आणि अदानी पॉवरने ठाण्यासाठी परवाना मागितला आहे. टोरेंटने पुण्यासाठी अर्ज केला आहे. ती सध्या भिवंडीशिवाय शिळ-मुंब्रा-कळव्यात वितरण फ्रँचायझी म्हणून काम करत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज