शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी-तापाच्या रुग्णांना खासगी रुग्णालये करताहेत दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 00:03 IST

पूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षण दिसल्यास रुग्ण शहरातील कुठल्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेत होता; मात्र कोरोनाचे संक्रमण पसरल्यानंतर सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने नाकारले आहे.

ठळक मुद्देमोठ्या खासगी रुग्णालयात रुग्णांची करताहेत पहिले स्क्रीनिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षण दिसल्यास रुग्ण शहरातील कुठल्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेत होता; मात्र कोरोनाचे संक्रमण पसरल्यानंतर सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने नाकारले आहे. त्यामुळे ही लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. तर रुग्णसुद्धा भीतीपोटी रुग्णालयात जाण्यापासून कचरत आहेत.खासगी रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे की, कोरोनाच्या संदर्भात दिशानिर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचे पालन केले जात आहे. शहरातील तीन सरकारी रुग्णालयात कोरोनाची टेस्ट केली जात आहे. अशात खासगी रुग्णालयात उपचार करण्यापेक्षा त्याला योग्य ठिकाणी रेफर केले जात आहे. सध्या खासगी रुग्णालयाच्या ओपीडीत रुग्णांची संख्या केवळ १० ते १५ टक्के आहे. काही छोट्या डिस्पेंसरीजमध्ये डॉक्टर आपल्या स्तरावर रुग्णांची तपासणी करीत आहेत. सर्दी व तापासाठी औषध देत आहेत. तीन ते पाच दिवसात रुग्ण ठीक न झाल्यास त्याला सरकारी रुग्णालयात रेफर केले जात आहे.व्हिडिओ कॉन्फरनिसंगद्वारे दिला जातो सल्लावोक्हार्ट रुग्णालयाच्या सेंटर हेड के. सुजाता यांनी सांगितले, कोरोनाच्या संदर्भात राज्य सरकारचे दिशानिर्देश जारी झाले आहेत. त्याचे अनुकरण रुग्णालय करीत आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालायातील ओपीडी १० टक्क्यांवर आली आहे. वोक्हार्टने ऑनलाईन ओपीडी सुरू केली आहे. यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली जात आहे. कुठला रुग्ण जर रुग्णालयात येत असेल तर त्याची स्क्रीनिंग केली जात आहे. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याला मेडिकल अथवा मेयोत रेफर केले जात आहे.कोरोनाचे लक्षण दिसल्यास रेफर करतोएलिक्सिस हॉस्पिटलचे सिनियर हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. तुषार गवाड म्हणाले रुग्णालयाची ओपीडी नियमित सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी येथे येणाऱ्या रुग्णाचे पहिले स्क्रीनिंग केले जाते. एक्स-रे सुद्धा काढले जात आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्यांना मेडिकल व मेयोमध्ये रेफर केले जात आहे. कोरोनाच्या तपासणीची सुविधा खासगी रुग्णालयाला देण्यात आली नाही. ओपीडीमध्ये येणाºया रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री सुद्धा घेतली जात आहे.ओपीडी सुरू पण रुग्ण कमीकेअर रुग्णालयाचे रवी मामीडवार म्हणाले रुग्णालयातील ओपीडी सुरू आहे. मात्र रुग्णांची संख्या १० टक्क्यावर आली आहे. येथे येणाऱ्या रुग्णाची पहिले स्क्रीनिंग केली जाते. रुग्णालयात पीपीई किट घालूनच रुग्णांची तपासणी केली जाते. शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे. जर कुठल्या रुग्णात कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याला मेडिकल व मेयोमध्ये रेफर केले जाते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर