शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:12 IST

जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला.

ठळक मुद्देमृतदेह पोत्यात बांधलेला माथनी शिवारातील कन्हान नदीत गवसला

आॅनलाईन लोकमतनागपूर: जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. देवकृपा हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर) यांचा असल्याचे तसेच ते व्यापाऱ्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ते बुधवारपासून (दि. २७) बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून या भागात फेकला असल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.राजू नारंग यांचा मृतदेह पोत्यात भरला असून, तो पिवळ्या रंगाच्या साडी आणि मळकट चादरीत गुंडाळलेला होता.त्यांचा आधी साडीने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून तो माथनी शिवारातील पुलावरून खाली फेकला असावा, असा अंदाज प्रमोद मडामे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचेही पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह राजू नारंग यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले.ते गेल्या १८ वर्षांपासून नागपूर शहरातील व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. ते शांत स्वभावाचे असून, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने त्यांच्या रामदासपेठ (नागपूर) येथील कार्यालयात जायला निघाले. मात्र, १.३० वाजेपर्यंत ते कार्यालयात न पोहोचल्याने त्यांचे मालक वाधवानी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली.ते कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी लकडगंज (नागपूर) पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून पोलीसही त्यांचा शोध घेत होते.मोबाईल लोकेशनची तपासणीतक्रार दाखल होताच लकडगंज पोलिसांनी राजू नारंग यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यांचा मोबाईल बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कळमना व डिप्टी सिग्नल भागात तर रात्री लोकमत चौकात कार्यरत असल्याचे आढळून आले. रात्री ८ नंतर त्यांच्या फोनचे लोकेशन वाडी येथे मिळाले. त्यानंतर त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याकडे बुधवारी २५ ते ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नव्हती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरणात परिचित व्यक्तीचा सहभाग असून, अपहरणासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

साडी व चादर महत्त्वाचे पुरावेराजू नारंग यांचा मृतदेह साडी व चादरीत गुंडाळलेला होता. त्यांच्या गळ्याला साडी गुंडाळलेली होती. मृतदेह भरण्यासाठी वापरण्यात आलेले पोते हे मिरचीचे होते. त्यामुळे साडी, चादर व पोते या तीन वस्तू तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Crimeगुन्हा