शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला रोखण्यासाठी नागपूर कारागृहातील कैदी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:53 IST

कारागृहातील खतरनाक कैद्यांपैकी अनेक कैदी आता कोरोना रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोनाचा धोका थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती सुरू केली आहे.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारागृहातील खतरनाक कैद्यांपैकी अनेक कैदी आता कोरोना रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोनाचा धोका थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती सुरू केली आहे. या मास्कचा दर्जा चांगला असल्यामुळे कारागृहातील मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. विशेष म्हणजे, २३ एप्रिलपर्यंत मध्यवर्ती कारागृहाने विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच ग्रामपंचायतींना एकूण ४५ हजार मास्कचा पुरवठा केला आहे.येथील मध्यवर्ती कारागृहात राज्यातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक खतरनाक गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कारागृहात त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेतली जातात. कोरोनाची दहशत सर्वत्र झपाट्याने वाढल्यानंतर हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा मोठा उपयोग होतो, हे लक्षात आले. त्यानंतर ठिकठिकाणांहून मास्कची प्रचंड मागणी वाढली. परिणामी अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला. काही ठिकाणी मास्कची दामदुप्पट दराने विक्री केली जाऊ लागली. दर्जा चांगला नसतानादेखील एका मास्कसाठी ५० रुपये, ६० रुपये आणि काही ठिकाणी शंभर रुपये घेतले जात होते. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी कैद्यांकडून मास्कची निर्मिती करवून घेण्याचे ठरविले. आरंभी या मास्कचा वापर कारागृहातील समोर काम करणारे रक्षक, आणि कारागृहातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी करण्यात आला. दर्जा अतिशय चांगला असल्यामुळे पोलिसांनी हे मास्क मागितले. नंतर आरोग्य विभागाने त्याची मागणी केली. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळा, कोषागार विभाग, न्यायालय तसेच विविध विभागप्रमुख कारागृह प्रशासनाकडे मागणी नोंदवू लागले. त्यानंतर अमरावती मध्यवर्ती कारागृह, वाशिम, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या कारागृहांतून तसेच ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींतून आणि नगरपंचायतींकडूनही या मास्कला मागणी आली.निर्मितीचा वेग वाढलाठिकठिकाणांहून मास्कची आॅर्डर येत असल्यामुळे अधीक्षक कुमरे यांनी मास्क निर्मितीचा वेग वाढवला. त्यासाठी अनेक कुशल कैद्यांना कामी लावले. प्रारंभी दरदिवशी २०० ते ३०० नंतर ५०० आणि आता रोज २ हजार मास्क कारागृहात तयार केले जात आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस