शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:59 IST

कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : संचित रजेची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे.रामभरोसे ऊर्फ रंगा पन्नालाल मालविया (३७) असे बंदिवानाचे नाव असून तो कन्हान येथील रहिवासी आहे. बंदिवानाने वांरवार कायद्याचा भंग केल्यास संचित रजा मिळणे हा त्याच्या अधिकाराचा भाग रहात नाही. अशी प्रकरणे प्रशासनाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून राहतात. प्रशासनाने दाखविलेल्या विवेकबुद्धीला ठोस आधार असल्यास त्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास वाव नसतो असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.मालवियाला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याने आतापर्यंत ११ वर्षे १० महिन्यांवर शिक्षा भोगली आहे. २४ आॅगस्ट २०१७ रोजी सरकारने पोलीस पडताळणी अहवाल लक्षात घेता त्याचा संचित रजेचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली. यापूर्वी मालवियाला ८ आॅगस्ट २००८ रोजी अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी त्याने ११७ दिवस विलंबाने आत्मसमर्पण केले होते. तसेच, ७ सप्टेंबर २००९ रोजी संचित रजा (फर्लो) मंजूर केली असता त्याला अटक करून कारागृहात आणावे लागले होते. दरम्यान, तो १०५५ दिवस अवैधपणे कारागृहाबाहेर राहिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने एकदा आरोपीची संचित रजा देण्याची विनंती फेटाळली होती.

टॅग्स :jailतुरुंगHigh Courtउच्च न्यायालय