शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

उत्पन्नासह पाणी प्रश्नाला प्राधान्य : अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:11 IST

महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

ठळक मुद्देउत्पन्नाची साधने वाढविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्तअभिजित बांगर यांनी दिली.महापालिकेत रुजू झाल्यानंतर बांगर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यामुळे तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे. परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आगामी उन्हाळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येईल. जीएसटी लागू झाला आहे. जीएसटीच्या शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर महापालिकेचे उत्पन्न अवलंबून आहे. हे अनुदान पुरेसे नाही. तथापी महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मालमत्ता कराच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्यात येईल. सोबतच महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक ठरले आहे.शहराच्या विकासासंदर्भात बोलताना आयुक्त बांगर म्हणाले नागरिकांकडून प्राप्त समस्या आणि त्यांच्या अडचणीनुसार शहरात काम करणे आवश्यक आहे. एकूणच शहरातील नागरिक, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजना यशस्वीपणे राबविण्यावर आपला भर राहणार आहे. पालघर आणि अमरावती शहराचा अनुभव आपल्या पाठीशी असून शहराच्या विकासाकरिता लोकांकडून अभिप्रायांची अपेक्षा आहे. सामान्य जनता, प्रशासनासोबत काम करतानाच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार काम करण्याची भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले....तर वाद होणार नाहीनागरिकांची सेवा करणे हाच प्रामाणिक उद्देश असेल तर वाद होणार नाही, असेही मनपा आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. महापालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचे तास वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले. सर्वच ठिकाणी मनुष्यबळाची समस्या आहे. त्यामुळे कामाचे तास वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :commissionerआयुक्तAbhijit Bangarअभिजित बांगर