शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वच्छतेला प्राधान्य द्या : संजय धिवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:09 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.

ठळक मुद्देप्रशासनाने घेतला पूर्वतयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, चिन्मय पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, एन.आर.सुुटे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे ७ लाखांपर्यंत अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व साफसफाई, २४ तास वीजपुरवठा, बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपायुक्त संजय धिवरे यांनी दिले.‘दीक्षाभूमी’ येथे दिनांक ५ ते ९ऑक्टोबर दरम्यान अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपायुक्त धिवरे यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्यावतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जास्तीत जास्त फिरते शौचालयाची व्यवस्था करावी. अंबाझरी तलाव या प्रेक्षणीयस्थळी यात्रेकरु मोठ्या प्रमाणावर येतात. अंबाझरी तलाव भरलेला असल्यामुळे या परिसरात लाईफ गार्डसची बोटीसह व्यवस्था करण्यात यावी. विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकरिता जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. तसेच गर्दीच्या वेळी मोबाईल नेटवर्क योग्यरीतीने काम करीत नसल्याने पोलिसांसाठी वायरलेस यंत्रणा उपलब्ध करण्यात यावी.आरोग्य विभागाने आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच मुख्य मैदानात विविध ठिकाणी मोबाईल स्ट्रेचरची व्यवस्था करावी. पोलीस विभागाने पोलीस नियंत्रण व सहाय्यता कक्ष मोबाईल झोन तयार ठेवावे. भाविकांना अन्नदान वाटपामुळे काहीही अनुचित घटना घडू नये, याबाबत संबधित विभागाने विशेष काळजी घ्यावी. आकस्मिक पाऊस, वादळ आल्यास भाविकांची गैरसोय होऊ नये, याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुसज्ज राहावे, अशी सूचना त्यांनी दिली.दीक्षाभूमी येथे वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा एकदिवसीय अर्थात ८ ऑक्टोबर रोजी असला तरी अनुयायांची गर्दी ५ ऑक्टोबरपासून वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु द्याव्यात, असे डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी