शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरात समांतर सेतू कार्यालयावर छापा; विविध बनावट प्रमाणपत्रे, स्टॅम्प जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 23:40 IST

जुना फुटाळा परिसरातील बनावट सेतू कार्यालय चालविणा-याच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. तेथे तयार करण्यात येणारी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणेही पोलिसांनी जप्त केली.

नागपूर : जुना फुटाळा परिसरातील बनावट सेतू कार्यालय चालविणा-याच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. तेथे तयार करण्यात येणारी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणेही पोलिसांनी जप्त केली. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली ही कारवाई मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती, हे विशेष!अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरस्वती अशोक सहारे राहतात. त्यांच्याकडे त्यांचा भाऊ नितीन ईश्वर वासनिक (वय २८, रा. संजयनगर, ट्रस्ट लेआऊट, अंबाझरी) राहतो. तो मूळचा देवलापार, ता. रामटेक येथील रहिवासी आहे. प्रारंभी तो जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय परिसरात छोटी-मोठी कामे करायचा. या भागातील दलालांच्या संपर्कात आल्यानंतर नितीन वासनिकने बनावट प्रमाणपत्रे तयार करवून घेण्याचे तंत्र शिकले. त्यासाठी लागणारे विविध सरकारी कार्यालयातील रबर स्टॅम्प बनवून घेतले. संगणक, स्कॅनर, प्रिंटर विकत घेतले. त्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या घरात समांतर सेतू कार्यालय सुरू केले. तेथून ड्रायव्हिंग लासन्सस, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, लिव्हिंग, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, इन्श्युरन्स, इन्कम सर्टिफिकेट, शपथपत्र, जन्म-मृत्यू दाखले तयार करू लागला. तो आणि त्याचे साथीदार शासन आणि नागरिकांची फसवणूक करून त्यांना सर्रास हे बनावट प्रमाणपत्र अनेक दिवसांपासून देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-१ला ही माहिती कळाल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सहारेच्या घरी छापा घातला. पोलिसांना तेथे मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणे, रबरी स्टॅम्प आढळले. पोलिसांनी ते सर्व जप्त केले.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त (डिटेक्शन) संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, संजय चव्हाण, राजकुमार देशमुख, हवालदार सुनील चौधरी, अफसरखान पठाण, राजेंद्र सेंगर, नायक अमित पात्रे, राहुल इंगोले, मंगेश मडावी आणि नीलेश वाडेकर यांनी ही कामगिरी बजावली.त्यांचे काय?पोलिसांनी ही बनावट कागदपत्रे जप्त केली. शिवाय यात नितीन वासनिकसह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलीस अटक करतील. मात्र, ज्या शेकडो नागरिकांनी ही बनावट कागदपत्रे यांच्याकडून घेतली आणि ती शाळा-महाविद्यालयासह विविध कार्यालयात दिली, त्यांचे काय होणार, असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर