शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा भर जनतेच्या मनोधैर्यावर तर मुख्यमंत्र्यांचा आराखड्यावर; ‘कोरोना’काळातील अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:20 IST

‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता. या दोन्ही नेत्यांच्या संबोधनांच्या तुलनात्मक विश्लेषणावर अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्रोफेसर डॉ. धर्मेश धवनकर यांच्या नेतृत्वात वरील अध्ययन करण्यात आले. १८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत दोन्ही नेत्यांनी केलेल्या संबोधनावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करण्यात आले.अध्ययनातील निष्कर्षानुसार ‘लॉकडाऊन’संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल माहिती दिली. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात ‘लॉकडाऊन’चे नियोजन व राज्य सरकारची धोरणे यांची माहिती देण्यावर भर होता. या अध्ययनात निधी वैरागडे व तेजस अंजनकर यांनी सहकार्य केले.अध्ययनातील महत्त्वाच्या बाबीदोन्ही नेत्यांनी ‘लॉकडाऊन’च्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला नाही.दोघांनीही ‘फेक न्यूज’वर बोलण्याचे टाळलेपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.पंतप्रधानांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला. जसे की ९ कुटुंबांना २१ दिवसासाठी मदत करण्याचा संकल्प.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते. ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’सारखे आवाहनपंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षमुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस