शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

‘मेट्रो’च्या ‘चीन कनेक्शन’चा वाद पंतप्रधान दरबारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 21:30 IST

एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमिका घेतली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे.

नागपूर, दि. 1 - एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमिका घेतली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांकडे चर्चेसाठी वेळदेखील मागण्यात आली आहे. सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना तसेच  घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेत आॅगस्टमध्ये देशभरात संघ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विदर्भात ५ ते २० आॅगस्टदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे संघाचे स्वयंसेवकच सत्तास्थानी असलेल्या नेत्यांनी नागपूर मेट्रोच्या ६९ डब्यांचे ८५१ कोटी रुपयांचे कंत्राट चक्क चीनच्या कंपनीला दिले आहेत. ही दुर्दैवी बाब असून आम्ही सुरुवातीपासून याचा विरोध करत आहोत. देशातच हे डबे बनू द्या, अशी विनंती आम्ही अधिकारी, मंत्र्यांना केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांकडेच दाद मागितली असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे अखिल भारतीय प्रमुख अजय पत्की यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली.  यावेळी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे विदर्भ संयोजक सुभाष लोहे, उपाध्यक्ष दादाजी उके, सहसंयोजक माधव गोडसे, कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन, कॅप्टन (सेवानिवृत्त) चंद्रमोहन रणधीर, फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, विश्व संवाद केंद्राचे प्रसाद बर्वे, समीर गौतम, रविंद्र बोकारे, अतुल मोघे प्रामुख्याने उपस्थित होते.  २ लाख घरापर्यंत पोहोचणार स्वदेशी जागरण मंचतर्फे राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेची सुरुवात १२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. विदर्भात ५ ते २० आॅगस्टमध्ये स्वदेशी पंधरवडा राबविण्यात येईल. यामाध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनिज’ वस्तूंमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. चीनचे वित्तीय आक्रमण परतावून लावण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात येईल. या १५ दिवसांत नागपुरातील २ लाख घरांपर्यंत तर इतर जिल्ह्यांतील ५० हजार ते १ लाख घरांपर्यंत कार्यकर्ते प्रत्यक्ष पोहोचतील, अशी माहिती अजय पत्की यांनी दिली.