शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान करणार ‘आयआयएम’, ‘एम्स’चे भूमिपूजन

By admin | Updated: November 2, 2015 02:05 IST

राज्य शासनातर्फे ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) व ‘एम्स’ला (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची माहिती : विधी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नेमणूक लवकरचंनागपूर : राज्य शासनातर्फे ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) व ‘एम्स’ला (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या संस्थांच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होईल व भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील टिळक पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.‘आयआयएम’ व ‘एम्स’च्या इमारतीचे भूमिपूजन सोबतच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबत पंतप्रधान येणार असून त्यांच्या कार्यालयातून याबाबत विचारणा झाली आहे. याची तारीख अंतिम व्हायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘ट्रिपल आयटी’ (इंडियन इस्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठ तसेच ‘नायपर’ यांची घोषणा झाली. यातील ‘ट्रिपल आयटी’ व राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठाची जागा अंतिम झाली आहे. विधी विद्यापीठाचे काम एव्हाना सुरू व्हायला हवे होते. परंतु यातील कायद्याच्या वाक्यरचनेमुळे कायदेशीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. संबंधित विद्यापीठाचा कुलगुरू त्याच विद्यापीठातील असावा, अशी ही वाक्यरचना होती. परंतु विद्यापीठच अस्तित्वात नसल्याने कुलगुरू कुठून येणार, असा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे यात सुधारणा करण्यात आली असून आता याच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या विद्यापीठाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी नेमण्यात येतील. शिवाय याची इमारत उभी होण्याची वाट न पाहता ‘जोती’ (ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) येथे वर्ग सुरू करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोंडवाना विद्यापीठासाठी देखील गडचिरोली येथे जागा पाहण्यात आली आहे. ही जागा वन विभागाच्या अखत्यारित असून लवकरच येथील अडचणी सोडवून ही जागा विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.नासुप्रने मागितले ३६ कोटीशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अगोदर उत्तर नागपुरात येणार होते. परंतु येथील जागेच्या हस्तांतरणासाठी नासुप्रने ३६ कोटी रुपये मागितले. दुसरीकडे या महाविद्यालयासाठी मिहान येथे जागा आरक्षित केली होती. त्यामुळे हे महाविद्यालय तेथे उभारण्यात येणार आहे. उत्तर नागपुरात कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरातील शैक्षणिक संस्था लवकरात लवकर उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.