शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूरसह विविध रेल्वे स्थानकावर 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट'चे उद्घाटन

By नरेश डोंगरे | Updated: March 12, 2024 21:15 IST

विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ : ऑनलाइन पद्धतीने जनऔषधी केंद्राचेही लोकार्पण

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी, १२ मार्च रोजी नागपूरसह विविध रेल्वेस्थानकांवर ओएसओपी (वन स्टेशन वन प्रॉडक्ट) स्टॉलचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी बडनेरा, अकोला आणि नागभीडसह अन्य तीन ठिकाणी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन (व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून) पार पडले.

पंतप्रधान मोदी यांनी आज मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे ऑनलाइन उद्घाटन, लोकार्पण केले त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानक, पांढुर्णा, पुलगाव, बल्लारशाह, मुलताई, बैतूल रेल्वेस्थानकांवर स्थानिक उत्पादकांना ग्राहक मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ओएसओपी स्टॉलचे उद्घाटन, बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, अकोला येथील रेल कोच रेस्टॉरंट आणि नागभीड (जि. चंद्रपूर) येथील जनऔषधी केंद्राचे उद्घाटन पार पडले. त्याचप्रमाणे मुकुटबन स्थानकावर गती शक्ती कार्गो टर्मिनलचे आणि राजूर स्थानकावर राजूर गुडस् शेडचे लोकार्पण करण्यात आले. खापरी, सेवाग्राम आणि तिगाव स्थानकावर थर्ड आणि फोर्थ लाइनच्या लोकार्पणाचा कार्यक्रमही पार पडला.

पंतप्रधान मोदी यांनी अशाच प्रकारे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (दपूम) अंतर्गत येणाऱ्या कळमना-राजनांदगाव दरम्यानच्या कन्हान ते धनाैली सालवा, गुदमापर्यंतच्या तिसऱ्या रेल्वे लाइनचे लोकार्पण केले. १७ स्थानकांवर ओएसओपी स्टॉल, तीन नवीन गुडस् शेड, दोन जन औषधी केंद्रे आणि गती शक्ती कार्गोचेही लोकार्पण केले.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची उपस्थिती सेवाग्राम स्थानकावर खासदार रामदास तडस, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकावर खासदार कृपाल तुमाणे बैतूल रेल्वे स्थानकावर खासदार दुर्गादास उईके यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या शिवाय नागपूर, खापरी पांढुर्णा, बल्लारशाह, तीगाव, मुकुटबन आणि राजूर येथील कार्यक्रमांना स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, अतिरिक्त व्यवस्थापक पी. एस. खैरकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, संजय सिन्हा, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ए. के. सूर्यवंशी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग, सहाय्यक व्यवस्थापक अमित कुमार उपस्थित होते. 

टॅग्स :nagpurनागपूर