शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अ‍ॅग्रोव्हिजनच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 19:40 IST

विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून, ते दीड लाख शेतकऱ्यांना येथे मार्गदर्शन करतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देदीड लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन : उत्तर प्रदेश, त्रिपुरा व आसामच्या मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून, ते दीड लाख शेतकऱ्यांना येथे मार्गदर्शन करतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.गडकरी म्हणाले, यंदाचे १० वे अ‍ॅग्रोव्हिजन आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्रिपुराचे मुख्यमंत्री व आसामचे मुख्यंमंत्री... यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये उत्पादन तंत्रज्ञान, शेतपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा यावर कार्यशाळा होतील. दुग्धव्यवसाय, बांबू लागवड, व्यापारी संधी आणि ऊस उत्पादन या विषयांवर एकदिवसीय परिषद होईल. भारतातील शेतीविषयक उत्पादने करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. पशु प्रदर्शनही आयोजित केले जाईल. तीन उत्कृष्ट जनावरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. पशुपालन, दुग्धव्यवसाय या विषयांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण दिले जाईल.विद्यार्थ्यांसाठी कृषी मंथन स्पर्धा होईल. इनोव्हेशन व स्टार्टअपची प्रदर्शनात मांडणी केली जाईल. उत्कृष्ट व उपयुक्त संशोधनाची राज्य पातळीवर निवड करून, त्यास व्यावसायिक रूपांतरणासाठी तांत्रिक सहकार्य पुरविले जाणार आहे. गेल्या दहा वर्षांत विदर्भातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया शेतकऱ्यांचा अ‍ॅग्रोव्हिजन अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागर समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, गिरीश गांधी, रवी बोरटकर, रमेश मानकर, माजी आ. आशिष जैस्वाल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadkariनितीन गडकरी