पंतप्रधान मोदी मेट्रोत बसणार, सभाही घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 10:23 PM2019-09-04T22:23:32+5:302019-09-04T23:40:03+5:30

हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे.

Prime Minister Modi will board in the metro, take the meeting | पंतप्रधान मोदी मेट्रोत बसणार, सभाही घेणार

पंतप्रधान मोदी मेट्रोत बसणार, सभाही घेणार

Next
ठळक मुद्देमेट्रो रेल्वेच्या सुभाषनगर ते सीताबर्डी मार्गाचे लोकार्पण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. तत्पूर्वी स्टेशनवर महामेट्रोतर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.


पंतप्रधान सायंकाळी ५ वाजता मेट्रोमधून सुभाषनगर ते इंटरचेंज सीताबर्डी स्टेशनपर्यंत प्रवास करतील. जवळपास पाच कि़मी.च्या प्रवासात मेट्रोचा वेग २५ कि़मी. प्रति तास राहील. मेट्रो सायंकाळी ५.२० वाजता सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर पोहोचणार आहे. कोचमध्ये पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मंत्री, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, सर्व संचालक आणि वरिष्ठ अधिकारी प्रवास करणार आहेत. पंतप्रधान सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इंडोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत. स्टेडियममध्ये एनएचएआय आणि मनपाच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून जाहीर सभेला मार्गदर्शन करतील.
असा असेल क्रम

  • दुपारी ४.२० मिनीट औरंगाबादहून नागपूर विमानतळावर आगमन
  • दुपारी ४.५० वाजता सुभाषनगर मेट्रो स्थानकावर आगमन
  • दुपारी ४.५५ वाजता महामेट्रोच्या प्रदर्शनीचे उद्घाटन
  • सायंकाळी ५ वाजता लोकमान्य नगर ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो मार्गाचे लोकार्पण
  • सायंकाळी ५.०२ वाजता सुभाषनगर मार्गाहून मेट्रो प्रवासाला सुरुवात
  • सायंकाळी ५.२० वाजता सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्थानकावर आगमन
  • सायंकाळी ५.३० वाजता सिताबर्डीहून मानकापूर इन्डोअर स्टेडिअमकडे प्रस्थान
  • सायंकाळी ५.५० वाजता मानकापूर येथे कार्यक्रमस्थळी आगमन
  • सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात


अद्याप मार्ग निश्चित नाही
सिताबर्डी येथून मानकापूर इन्डोअर स्टेडियमकडे पंतप्रधान रस्तेमार्गानेच जाणार आहेत. मात्र ते नेमक्या कुठल्या मार्गाने जातील हे अद्याप निश्चित झालेले नाही. सिताबर्डीहून ते थेट सदरमार्गे मानकापूरकडे जाऊ शकतात. परंतु तेथे काम सुरू असल्याने महाराजबाग चौक, आकाशवाणी चौक या मार्गाने काटोल मार्ग चौक व तेथून पुढे मानकापूर स्टेडियमकडेदेखील जाऊ शकतात. यासंदर्भात सुरक्षायंत्रणांकडून संपूर्ण चाचपणी झाल्यानंतरच अंतिम मार्ग निश्चित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Prime Minister Modi will board in the metro, take the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.