शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळाबाबत ‘या’ ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी; काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे आवाहन

By कमलेश वानखेडे | Updated: May 27, 2023 18:33 IST

Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले. पंतप्रधानांनी आतातरी मौन सोडावे व देशाला उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गौरव वल्लभ यांच्या हस्ते पंतप्रधानांना विचारण्यात आलेल्या नऊ प्रश्नांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गौरव वल्लभ म्हणाले, राष्ट्रपती या देशाच्या पहिल्या नागरिक आहेत. मात्र, नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत असताना आदिवासी असलेल्या महिला राष्ट्रपतींना का बोलाविण्यात आले नाही, असा सवाल करीत केवळ उद्घाटनाच्या फलकावर राष्ट्रपतींचे नाव प्रथम व नंतर पंतप्रधानांचे नाव येईल म्हणून राष्ट्रपतींना बोलावणे टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २० पक्षांचे प्रतिनिधी या सोहळ्याला अनुपस्थित राहले तर लोकशाहीचा हा सोहळा पूर्ण होणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना लोकार्पणासाठी बोलवावे, आम्ही सर्व विरोधी पक्ष पहिल्या रांगेत उपस्थित राहून टाळ्या वाजवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मोदी हे राजधर्म वर चर्चा न करता राजदंडावर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा, आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, उमेश डांगे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.

असे आहे ९ प्रश्न

- १)गेल्या ९ वर्षात बेरोजगारी व महागाई एवढी का वाढली ?

२) कृषी उत्पन्न दुप्पट होणार होते ते फक्त ५ टक्केच का वाढले ?३) अदानींच्या कंपन्यांमध्ये शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले २० हजार कोटी कुणाचे आहेत ?

४) चीनच्या राष्ट्रपतींसोबत आजवर १८ वेळा बैठका होऊनही चीनही दीड हजार किलोमीटर भारतीय भूभागावर नियंत्रण कसे मिळविले आहे, भारतातील शहरांची नावे चीन का बदलत आहे ?५) द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी का घातले जात आहे ?

६) दलितांवरील अत्याचार २३ टक्क्यांनी का वाढले, जाती निहाय जनगनना का केली जात नाही ?७ ) लोकनियुक्त सरकार ईडी, सीबीआयचा दबाव टाकून पाडली जात आहेत. संविधान खिळखिळे करण्याचा प्रयत्न का करताय ?

८ ) मनरेगा सारख्या जनकल्याणाच्या योजनांच्या निधीत कपात का केली ?९ ) कोरोनात चुकीच्या नियोजनामुळे ४० लाख लोकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबियांना भरपाईच्या रुपात मदत का दिली नाही ?

टॅग्स :congressकाँग्रेस