शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीच्या धडकेने पुजाऱ्याचा मृत्यू; अमरावती-नागपूर महामार्गावरील अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 20:12 IST

Nagpur News वेगात येणाऱ्या फॉर्च्युनरने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साेनेगाव शिवारात गुरुवारी (दि. २) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

नागपूर : वेगात येणाऱ्या फॉर्च्युनरने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीचालक पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साेनेगाव शिवारात गुरुवारी (दि. २) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

भीमराव भांडेकर (६५, रा. विकासनगर, कोंढाळी, ता. काटाेल) असे मृत दुचाकीचालक पुजाऱ्याचे नाव आहे. ते हनुमानभक्त असल्याने विकासनगर, काेंढाळी येथील मंदिरात राेज सकाळी पूजा, आरती, भजन व इतर धार्मिक कार्य नियमित करायचे. त्यांनी गुरुवारी सकाळी मंदिरातील धार्मिक विधी आटाेपले आणि पेट्राेल खरेदी करण्यासाठी एमएच-४०/एबी-७५०३ क्रमांकाच्या दुचाकीने पेट्राेल पंपावर गेले. पेट्राेल खरेदी केल्यानंतर ते याच दुचाकीने काेंढाळीच्या दिशेने यायला निघाले.दरम्यान, साेनेगाव शिवारात अमरावतीहून नागपूरच्या दिशेने वेगात येणाऱ्या सीजी-०४/एनई-९९८१ क्रमांकाच्या फॉर्च्युनरने त्यांच्या दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यामुळे भीमराव दुचाकीसह रस्त्यावर काेसळल्याने गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना जखमी अवस्थेत काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले.

तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काेंढाळी येथे शाेककळा पसरली हाेती. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी फॉर्च्युनर चालक रामप्रसाद तुलसीराम बघेल (३४, रा. रायपूर, छत्तीसगड) याच्याविराेधात भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू