शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

सलग पाचव्या वर्षी कापसाच्या 'बीजी-२' बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना कापसाचा उत्पादन खर्च परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:19 IST

उत्पादन खर्च वाढणार : सलग पाच वर्षांत १७१ रुपयांनी वाढविले दर

सुनील चरपेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग पाचव्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाण्यांच्या दरात प्रतिपाकीट (प्रत्येकी ४५० ग्रॅम) ३७ रुपयांनी वाढ केली आहे. सलग पाच वर्षातील ही दरवाढ १७१ रुपयांची आहे. इतर कृषी निविष्ठांसोबत बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

देशात दरवर्षी सरासरी १२७ लाख हेक्टर, तर महाराष्ट्रात ४२ लाख हेक्टरमध्ये कापसाचे पीक घेतले जाते. अलीकडे कापसाच्या सघन लागवड पद्धतीचा अवलंब केला जात असून, देशभरातील क्षेत्र २७ लाख हेक्टर, तर महाराष्ट्रातील क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. साध्या लागवड पद्धतीत हेक्टरी ५, तर सघन पद्धतीत हेक्टर १५ पाकिटांचा वापर केला जातो. त्यामुळे साध्या पद्धतीत बियाण्याचा खर्च प्रतिहेक्टर १८५ रुपयांनी, तर सघनमध्ये ५५५ रुपयांनी वाढणार आहे. 

देशभर वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या बीजी-२ बियाण्यांमधील जनुकांसाठी बियाणे उत्पादक कंपन्या अथवा केंद्र सरकार कुणालाही रॉयल्टी देत नाही. हे बियाणे गुलाबी बोंडअळीला प्रतिबंधक राहिले नसल्याने तसेच केंद्र सरकारने बंदी घातल्याने बीजी-२ बियाणे अपडेटही करण्यात आले नाहीत; तरीही सरकार सातत्याने दरवाढ करीत आहे. 

खर्च वाढला, उत्पादन घटलेगुलाबी बोंडअळी व रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिबंधक आणि तणनाशक सहनशील बियाणे वापरावर केंद्र सरकारने बंदी घातल्याने तसेच कृषी निविष्ठांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादन घटत आहे. मागील तीन वर्षांपासून कापसाचे दर सात ते आठ हजार रुपयांच्या आसपास घुटमळत असल्याने कापसाचे उत्पादन परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात.

बीजी-२ बियाण्यांची दरवाढवर्ष                     दरवाढ२०२०-२१           ७३० - स्थिर२०२१-२२           ७६७ - ३७ रुपये२०२२-२३           ८१० - ४३ रुपये२०२३-२४           ८५३ - ४३ रुपये२०२४-२५           ८६४ - ११ रुपये२०२५-२६           २०१ - ३७ रुपये

बीटी जनुके नसलेले बियाणे

  • देशात सन २००३ पासून बीजी-२ बियाण्यांचा वापर सुरू झाला. पूर्वी या बियाण्यांत गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक बॅसिलस थुरिंगिएन्सिस जनुके असायची. या जनुकांसाठी कंपनीला रॉयल्टी दिली जायची.
  • केंद्र सरकारने सन २०१० मध्ये बीजी बियाण्यांचे अपग्रेडेशन, चाचण्या व वापरावर बंदी घातली. त्यामुळे बीजी-२ बियाण्यांतील जनुके निष्क्रिय झाल्याने ते गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक राहिले नाही. या बियाण्याच्या ट्रायल्स घ्याव्या लागत नसून, एकदा तयार केलेले बियाणे तीन ते चार वर्षे चालते. त्यामुळे कंपन्यांना केवळ साठवणूक व वाहतुकीवर खर्च करावा लागतो.
टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती