शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हरभरा आणि तूर डाळीचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:03 IST

कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत.

ठळक मुद्दे हरभरा व तुरीची आवक वाढली : तांदळाचे भाव स्थिर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. १५ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे एक हजार आणि हरभरा डाळीचे भाव ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. निर्यातबंदीमुळे भाव वाढले नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.१५ दिवसांपूर्वी ठोक बाजारात दर्जानुसार ७५ ते ९० रुपये किलो असलेली तुरीची डाळ ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय हरभरा डाळ ५४ ते ५६ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बेसनाचे भावही कमी झाले आहेत.अडतिया रमेश उमाठे यांनी सांगितले की, तसे पाहता यावर्षी तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार नाहीत, पण बाजारात नवीन माल येण्याच्या वृत्ताने पूर्वीच भाव कमी झाले आहेत. १५ दिवसानंतर बाजारात मालाच्या आवकीचे प्रमाण पाहता भाव पुन्हा उंचावण्याची शक्यता आहे. यावर्षी उडद आणि मुगाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. मूग ठोकमध्ये प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये आणि मूग मोगर ९८ ते १०७ रुपयांवर पोहोचले आहेत. दहीवड्यासाठी उपयोगात येणाऱ्या उडद मोगरचे भाव गेल्या वर्षी १३५ रुपयांवर पोहोचले होते. पण उठाव नसल्यामुळे भाव कमी झाले. सध्या ९० ते ११५ रुपयांवर स्थिर आहेत. याशिवाय वाटाणा डाळीचे भाव कमी होऊन ठोकमध्ये प्रति क्विंटल ४ हजारांवर स्थिरावले आहेत. मोट प्रति किलो ६५ ते ८० रुपये आणि काबुली चणा ६५ ते ९० रुपये भाव आहेत.तांदळाची आवक वाढली, भाव स्थिरयावर्षी तांदळाचे उत्पादन चांगले असून बाजारात मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून जयश्रीराम आणि चिन्नोर तांदळाची सर्वाधिक मागणी असते. ठोकमध्ये श्रीराम तांदूळ दर्जानुसार प्रति क्विंटल ३८०० ते ४४०० रुपये आणि चिन्नोर ४३०० ते ४५०० रुपये भाव आहेत. त्याखालोखाल सुवर्णा २५०० ते २७००, बीपीटी ३ हजार ते ४४००, एचएमटी ३४०० ते ३६०० भाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून जयप्रकाश आणि शिवपार्वती या वाणाचे तांदूळ बाजारात येत आहे. भाव प्रति किलो ६० रुपये आहे.

टॅग्स :foodअन्नMarketबाजारnagpurनागपूर