शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'सावत्र मुलांच्या नावाने होणारी हिस्सेवाटणी रोखा' दुसऱ्या पत्नीला मालमत्तेपासून वंचित करणे आर्थिक शोषणच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:14 IST

Nagpur : पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार असतो. त्यामुळे पत्नीला या मालमत्तेच्या उपयोगापासून वंचित ठेवणे म्हणजे तिचे आर्थिक शोषण करणेच होय, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट करून सावत्र मुलांच्या नावाने होणारी मालमत्तेची हिस्सेवाटणी रोखणारा आदेश वैध ठरवला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार असतो. त्यामुळे पत्नीला या मालमत्तेच्या उपयोगापासून वंचित ठेवणे म्हणजे तिचे आर्थिक शोषण करणेच होय, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट करून सावत्र मुलांच्या नावाने होणारी मालमत्तेची हिस्सेवाटणी रोखणारा आदेश वैध ठरवला. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन हा निर्णय देण्यात आला.

या प्रकरणातील पतीने दुसरे लग्न केले असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले व एक मुलगी आहे. त्याचा दुसऱ्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू आहे. त्यामुळे त्याने तिला बळजबरीने माहेरी पाठवले आहे. दरम्यान, पती हा त्याची शेतजमीन, घर व इतर मालमत्ता मुलांच्या नावावर करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर पत्नीने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल करून स्वतःच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विविध मागण्या केल्या होत्या. परिणामी, न्याय दंडाधिकारी न्यायालयाने २२ मे २०१४ रोजी मालमत्तेची हिस्सेवाटणी रोखणारा आदेश दिला.

त्याविरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका या निर्णयाद्वारे गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आली. रेकॉर्डवर उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांवरून तक्रारकर्त्या पत्नीचा वादग्रस्त मालमत्तेवर हक्क असल्याचे दिसून येते. असे असताना पतीने तिला या मालमत्तेच्या उपयोगापासून वंचित ठेवले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार ही कृती पत्नीचे आर्थिक शोषण करणारी आहे, असे न्यायालय हा निर्णय देताना म्हणाले. 

अधिकार संरक्षणाचा कायदा

कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरणाऱ्या महिलांचे संवैधानिक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देशात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा महिलांना शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक व आर्थिक स्वरूपाच्या छळापासून संरक्षण प्रदान करतो, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

पत्नीचे भावनिक शोषण करणारे कृत्य : न्यायालय

पहिल्या पत्नीच्या मुलांपासून वेगळे राहण्याचा बहाणा करून पतीने ५ फेब्रुवारी २००८ रोजी दुसऱ्या पत्नीला शेगावला नेले होते.त्यानंतर त्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले. तसेच, न्यायिक विभक्ततेची नोटीसही बजावली.न्यायालयाने पतीचे हे कृत्य पत्नीचे भावनिक शोषण करणारे आहे, असेही नमूद केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stop Property Transfer to Stepchildren: Depriving Wife is Economic Abuse

Web Summary : Denying a wife property rights is economic abuse, ruled the Nagpur High Court, upholding an order preventing property transfer to stepchildren. The court considered the Domestic Violence Act, protecting a wife's rights against dispossession by her husband.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय