शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक थांबवा : माधवी खोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 22:46 IST

हातमागाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सणासुदीच्या दिवसात हातमाग कापडाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकण्यात येत आहे. त्यामुळे खऱ्या हातमाग कापडाची ओळख लक्षात घेऊनच खरेदी करावी तसेच हातमागाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले आहे.हातमागावर साडी व इतर कापड तयार करताना धाग्याचा ताण कमी असल्यामुळे कापडाला स्पर्श केल्यास ते मऊ वाटते. यंत्रमागाच्या कापडात कडकपणा जाणवतो. हातमागाचे विणकाम एकसारखे असून काही ठिकाणी धाग्याची गाठ दिसते. तर यंत्रमागाचे कापड एकसारखे असून त्यात असा प्रकार दिसत नाही. यंत्रमागाच्या कापडाची किनार एकसारखी असते आणि हातमागाच्या कापडाची किनार एकसारखी नसते हा फरक जाणवतो. हातमागावरील पारंपरिक साड्या, शाल, स्टोल्सचे दोन्ही बाजूचे नक्षीकाम एकमेकांचे प्रतिबिंब असल्यासारखे दिसते. हातमागावर कापडाचे विणकाम करताना कापडाच्या दोन्ही किनारावर ताण देण्यासाठी कंसरीच्या वापरामुळे कापडाच्या किनाऱ्यावर छिद्र दिसते. परंतु हे छिद्र एकसारखे अंतरावर नसते. हातमागाच्या साडीच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डिझाईन दिसून येते आणि साडीच्या मागील बाजूला वापरलेल्या धाग्याची व जरीची फ्लोटींग दिसत नाही. खऱ्या पैठणीत पुढील व मागील दोन्ही बाजूचे नक्षीकाम एकमेकांचे प्रतिबिंब असल्यासारखे दिसते. हस्तकला असल्यामुळे प्रत्येक पैठणी वेगळी असते. दोन पैठणीतील नक्षीकाम तंतोतंत सारखे आढळत नाही. नैसर्गिक रंग वापरल्याने पैठणीत फक्त मूलभूत रंग सापडतात. सूक्ष्म नक्षीकाम व सूक्ष्म प्रमाणात समरूपता आढळत नाही. केंद्र शासनातर्फे हातमाग कापडाचे तसेच रेशीम वस्त्राच्या उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला आवश्यक निकषावर हँडलूम मार्क आणि सिल्क मार्क अंतर्गत प्रमाणित करून विक्रीसाठी टॅग पुरविले जातात. त्यामुळे ग्राहक हे टॅग पाहून विश्वासाने हातमागाचे कापड खरेदी करू शकतात. हातमाग महामंडळाने भौगोलिक नामांकनांतर्गत पैठणी साडी व करवतीकाठी साडी या दोन उत्पादनांची नोंद प्राप्त केली असून या विशेष वस्त्राचे उत्पादन त्याच नावाने इतर भागात करणे हा गुन्हा आहे. ग्राहकांनी खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक लक्षात घेऊनच कापड खरेदी करण्याची गरज असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी कळविले आहे.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगnagpurनागपूर