शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर परिसरात सापडलेल्या बौद्ध धर्माच्या वस्तूंचे जतन करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:47 IST

गेल्या मे महिन्यामध्ये अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना सुमारे २५०० वर्षे जुन्या बुद्ध मूर्ती व बौद्ध धर्माशी संबंधित अन्य वस्तू आढळून आल्या.

ठळक मुद्देभारतीय बौद्ध महासभा व इतरांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना आढळून आलेल्या प्राचीन बुद्ध मूर्ती, अशोक स्तंभ, धम्मचक्र यासह इतर पुरातन वस्तूंचे जतन करण्यात यावे, या मुख्य मागणीसह भारतीय बौद्ध महासभा व इतर संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

गेल्या मे महिन्यामध्ये अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना सुमारे २५०० वर्षे जुन्या बुद्ध मूर्ती व बौद्ध धर्माशी संबंधित अन्य वस्तू आढळून आल्या. अभ्यासकानुसार, सम्राट अशोक यांच्या काळात या ठिकाणी साकेत हे बौद्ध धर्मीय शहर होते. त्यामुळे या सर्व वस्तूंना ऐतिहासिक महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता पुरातन वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी, राममंदिर परिसरात पुन्हा उत्खनन करून त्याचा विस्तृत अहवाल सरकारला सादर करण्यात यावा, पुरातन वस्तूंचे कार्बन डेटिंग अ‍ॅनालिसिस करून अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा, सर्व वस्तूंची लेखी माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात यावेत, या ठिकाणी आतापर्यंत सापडलेल्या सर्व पुरातन वस्तूंचे जाहीर प्रदर्शन करण्यात यावे आणि राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने सर्व प्राचीन वस्तूंचा ताबा स्वत:कडे घ्यावा, अशा अन्य मागण्या सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आल्या आहेत.

याचिकेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, पुरातत्त्व विभागाचे महासंचालक, उत्तर प्रदेश सरकार, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे दिल्लीतील अ‍ॅड. बी. के. गौतम, नागपुरातील अ‍ॅड. शैलेश नारनवरे आदी वकील कामकाज पाहणार आहेत.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय