लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजनी रेल्वेस्थानक परिसरातील ४४.४ एकर जागेत जागतिक दर्जाचे इंटर मॉडेल स्टेशन बांधणार आहे. त्यावर एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे.
- अंडरग्राऊंड पॅसेंजर लाऊंज
- मेट्रो स्टेशन
- फलाटापर्यंत जाण्यासाठी भूमिगत रस्ता
- शहर व एसटी बसेसना प्रथम फलाटपर्यंत जाण्याची व्यवस्था
- २५ वर्षाची गरज लक्षात घेऊन निर्मिती
- बजेट होटेल
- भाड्याने देण्यासाठी कार्यालये
- जागतिक दर्जाचे काम
सॅटेलाईट टर्मिनसच्या कामाला सुरुवातअजनीला सॅटेलाईट टर्मिनस बनविण्याच्या कामाला ऑक्टोबर-२०१८ पासून सुरुवात झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, १८ कोटी रुपयाच्या या कामासाठी सुरुवातीला दीड कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर निधीकरिता प्रकल्प रखडला. गेल्या फेब्रुवारीमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकल्पाला ८ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे काम पुन्हा सुरू झाले आहे. हे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.सॅटेलाईट टर्मिनसमधील कामे
- चार नवीन फलाट तयार करणे
- अधिक रेल्वेगाड्या टर्मिनेट करण्यासाठी चार स्टेबलिंग लाईन.
- नवीन ड्रेनेज सिस्टिम
- सर्व्हिस बिल्डिंग, अंडरग्राऊंड आरसीसी वॉटर टँक़
- कॅरेज वॉटरिंग लाईन.
- फूटओव्हर ब्रिजचा विस्तार
- वॉशिंग पिट लाईन.
प्रस्ताव पाठवला आहेमहामार्ग प्राधिकरणने लॅन्ड स्केपिंगचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाला पाठविला आहे. तसेच, अजनी सॅटेलाईट टर्मिनस प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील दबाव कमी होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अजनीतून जास्त रेल्वेगाड्या टर्मिनेट केल्या जातील.कृष्णनाथ पाटील, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.