शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:53 IST

उपराजधानीत शुक्रवारीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास तासभर चांगला पाऊस आला. यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आल्याचे दिसून आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : उपराजधानीत शुक्रवारीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास तासभर चांगला पाऊस आला. यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आल्याचे दिसून आले.शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. मात्र जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा नव्हती. १२ च्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता. रात्री ८.३० वाजेनंतर परत सुमारे २० मिनिटांसाठी शहरातील अनेक भागात चांगला पाऊस झाला.दरम्यान, हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १.२ मिमी पावसाची नोंद झाली तर सकाळी ८.३० ते ५.३० या कालावधीत नागपूर विमानतळावर १६.६ मिमी पाऊस झाल्याचे नोंदविण्यात आले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात शहरासह विदर्भाच्या अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात ४ ऑगस्टपर्यंत एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम मध्य भारतावर दिसेल. यामुळे पुढील काही दिवसात चांगला पाऊस होण्याची चिन्हे आहेत.मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातील जलसाठा वाढलादरम्यान नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली येथील मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांतील तलावांचा साठा वाढला आहे. सरासरी २३.९९ टक्के जलसाठे भरले आहेत. मात्र नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह येथे अद्यापही जलसाठा शून्यावरच आहे. ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर