शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जनविराेध माेडून अजनी वनातील ४५०० झाडे कापण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 09:28 IST

Nagpur News पर्यावरणप्रेमींची आंदाेलने व प्रचंड जनविराेध असताना विराेधाला न जुमानता प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी अजनीवनातील ४५२२ झाडे कापण्याची नाेटीस महापालिकेने जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे ही वृक्षताेड पहिल्या टप्प्यातील आहे की चारही टप्प्यांसाठी आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. - या आधारावर एनएचएआयला २० ते २२ हजार झाडे लावणे बंधनकारक ठरते. त्यामुळे एनएचएआयने कम्पेनसेटरी वृक्षाराेपणाची याेजना आखली का? आखली असेल तर ही झाडे कुठे लावणार आहेत?

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : काेराेना महामारीच्या भीषण काळात ऑक्सिजनचे माेल बहुतेकांना कळले, पण काहींना मात्र अजूनही कळलेले दिसत नाही. ऑक्सिजनसाठी प्लान्ट लावण्याची धडपड हाेताना फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची किंमत केली जात नाही. हाेय, पर्यावरणप्रेमींची आंदाेलने व प्रचंड जनविराेध असताना विराेधाला न जुमानता प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी अजनीवनातील ४५२२ झाडे कापण्याची नाेटीस महापालिकेने जाहीर केली आहे.

मनपाच्या उद्यान विभागाने रविवारी झाडे कापण्याबाबतची नाेटीस वर्तमानपत्रात प्रकाशित केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अर्जावर ४५२२ झाडे कापण्याची व प्रत्याराेपण करण्याची ही नाेटीस आहे. वृक्षताेडीविराेधात आक्षेप असणाऱ्यांनी सात दिवसांत उद्यान विभागाला लेखी तक्रारी देण्याचे आवाहन या जाहिरातीमध्ये केले आहे. याचाच अर्थ जनविराेध डावलून विविध प्रजातींची हजाराे झाडे कापण्याची तयारी मनपाच्या माध्यमातून एनएचएआयने चालविली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शांत राहिलेल्या पर्यावरणप्रेमींमध्ये पुन्हा असंताेष पसरला आहे. विशेष म्हणजे काेराेनामुळे लाॅकडाऊन लागलेला असताना मनपाने ऑनलाइन तक्रार नाेंदणीची व्यवस्था न करता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा अट्टाहास करणे म्हणजे धाेक्याला आमंत्रण देण्यासारखे असल्याचा आराेप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या जाहिरातीवरून अनेक माेठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे एनएचएआय व मनपालाही द्यावे लागणार आहेत. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी कुठल्याही परिस्थितीत विराेध नाेंदविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

- झाडांच्या संख्येवर संभ्रम : नाेटीसमध्ये ४५२२ झाडे कापण्याची माहिती आहे. एनएचएआयने सुरुवातीला १९०० झाडे सांगितली हाेती. पर्यावरणवाद्यांनी ७००० च्यावर. त्यानंतर उद्यान विभागाच्या माेजणीत ६५०० च्यावर झाडे आढळली व १०००० असण्याची शक्यता वर्तविण्यात आली हाेती. त्यामुळे काेणत्या आधारावर माेजणी झाली? झाडांच्या वयानुसार की बुंध्याची रुंदी कमी करून, हे उत्तर मिळणे अपेक्षित आहे.-

टॅग्स :Metroमेट्रो