शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अधिवेशनासाठी पोलीस सज्ज

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत.

तीन हजारावर पोलीस दाखल : फोर्स वन कमांडो’ पहिल्यांदाच तैनातनागपूर : येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच मुंबई फोर्स वन कमांडोंना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. यंदा अधिवेशनाचा बंदोबस्त हायटेक राहणार आहे. सर्व पोलीस अधिकारी व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पोलीस विभागही कडेकोट बंदोबस्तासाठी सज्ज झाला आहे. शहर पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी बंदोबस्ताची कमान स्वत: सांभाळली आहे. ते स्वत: दररोज प्रत्येक ठिकाणी बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी भेट देतात. राज्यातील अन्य जिल्हा पोलीस दलातून कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात येत असतात. यावेळी मुंबई (शहर आणि ग्रामीण), ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर ग्रामीण, अकोला, नांदेड, नाशिक, वाशिम, यवतमाळ येथून पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. यंदा दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, २९ सहायक पोलीस आयुक्त, ८५ पोलीस निरीक्षक, ३७० पोलीस उपनिरीक्षक, ३२०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या १४ प्लाटून, आठ कंपन्यांमधील जवान आणि १२०० होमगार्ड यांचा समावेश आहे. यासोबतच नागपुरातील वरिष्ठ अधिकारी शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईवरून विशेष पथक येणार आहे. यासोबतच रामगिरी, देवगिरी, विधानभवन, रविभवन आणि कार्यालयाच्या सुरक्षेसाठी गुप्त पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)निवास व्यवस्था पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था एमएसईबी गेस्ट हाऊस, सीआरपीएफ गेस्ट हाऊस व अमरावती मार्गावरील एनबीएसएस वसतिगृहात करण्यात आली आहे. २७ मंगल कार्यालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर विधानभवन, मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन, हैदराबाद हाऊस, आमदार निवास, शासकीय बंगले, तसेच मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट , संविधान चौक, एनआयटी चौक, आणि जयस्तंभ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. मोर्चेकरी, पोलीस सुरक्षा व्यवस्था आणि या रस्त्यांवरील हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. सीसीटीव्हीसाठी ८ पॉर्इंट बनविण्यात आले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अस्थायी स्वरूपाचे एक पोलीस नियंत्रण कक्षही तयार करण्यात येत आहे.