शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा आयुक्तांवर कायदेशीर कारवाईची सत्तापक्षाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:03 IST

लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणूनही आयुक्तांविरुद्ध पाऊल उचलता येते, असा इशारा मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसंवैधानिक बाबी तपासण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार दुर्बल घटक समितीची फाईल रोखल्याने आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुर्बल घटक समितीची ३० कोटी रुपयांची फाईल रोखल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत सत्तापक्ष आक्रमक झाले आहेत. संविधानात दुर्बल घटकांना त्रास देण्यासंदर्भात जे काही नियम-कायदे आहेत त्यानुसार पावले उचलण्यात येतील. यासाठी लवकरच कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणूनही आयुक्तांविरुद्ध पाऊल उचलता येते, असा इशारा मनपा सत्तापक्ष नेते संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिला आहे.त्यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले की, महापालिका चालवण्यासाठी काही नियम-कायदे आहेत. त्याला डावलून आयुक्त मुंढे काम करीत आहेत. त्यांच्या बाबींची, नियमांची अवहेलना करण्याबाबतच्या प्रकरणांची एक यादी तयार केली जात आहे. दुर्बल घटक समितीच्यावतीने ३४ लोकांच्या स्वाक्षरीनंतर फाईल मंजूर होत असते. ती आयुक्त रोखू शकत नाहीत.

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल होऊ शकतोदुर्बल घटकबहुल वस्त्यांच्या विकासाचा निधी रोखल्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल हाऊ शकतो, असेही सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सांगितले.

आयुक्तांनी कितीवेळा नियम तोडले याची तयार होतेय यादीमनपा आयुक्त नियमांना धाब्यावर बसवून काम करीत असल्याचा आरोप सत्तापक्षाने केला आहे. याची यादी तयार केली जात आहे. आयुक्तांनी कितीवेळा नियम तोडले, याची एक यादी सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने कुठलेही पाऊल उचलले नाही तर ती यादी पाठवली जाईल. महापौरांनी सभागृहात कार्यादेश झालेली कामे सुरू करण्याची आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर यांना हटविण्याची रुलिंग दिली होती. परंतु आयुक्तांनी दोन्ही प्रकरणात महापौरांना चुकीचे उत्तर दिले. जर ते सभागृहातील निर्देशांचे पालन करू शकत नसतील तर त्याला विखंडित करण्याचा प्रस्ताव ते राज्य सरकारला पाठवू शकतात. परंतु त्यांनी तसेही केले नाही.

लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे नागरिकांचा अपमानदयाशंकर तिवारी म्हणाले, नासुप्रच्या नियमानुसार स्थायी समिती अध्यक्ष थेट नासुप्रचे मनोनित सदस्य बनतात. परंतु नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रकरणात मात्र पत्र पाठविल्यानंतर आयुक्तांनी मात्र राज्य सरकार नोटिफिकेशन काढेल, तेव्हा प्रस्ताव समोर पाठवेन, असे सांगितले. एकतर त्यांना नियम-कायद्याची माहिती नाही, किंवा ते लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहे. लोकप्रतिनिधींचा अपमान करणे म्हणजे नागरिकांचा अपमान होय. नासुप्र बरखास्त झालेली नाही. त्यामुळे मनपाचा मनोनित ट्रस्टी तिथे असायला हवा.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका