शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नागपुरात विश्व योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 8:47 PM

नागपूर महापालिका व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे विश्व योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देमहापौरांनी घेतला तयारीचा आढावा: हजारो नागरिक सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिका व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे विश्व योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.आढावा बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका रुपा रॉय, उज्ज्वला शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त महेश मोरोणे, प्रकाश वराडे, गणेश राठोड, विजय हुमने, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथुल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक शरद साळुंके, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हितेंद्र वैद्य, गौरव दलाल, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिरसीकर, योगाभ्यासी मंडळाचे अतुल मुजुमदार, गोपेश जारगर, पतंजली योग समितीचे प्रदीप काटेकर, छाजुराम शर्मा, विवेक बहुजन हिताय कल्याणकारी संस्थेचे देवराव सवाईथुल, आय.एन.ओ.च्या सचिव सुवर्णा मानेकर, अश्विन जव्हेरी, श्री. योग साधना केंद्रचे डॉ. प्रभाकर मस्के, के.जी. पोटे, सतीश भुरे, डॉ. गंगाधर कडू, युनिटी एस.ए.चे संजय निकुले, नागपूर जिल्हा योग असोसिएशनचे अनिल मोहगावकर, वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिनिधी व आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, हर्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे श्रीकांत अण्णारपा, योगसूत्रा वे ऑफ लाईफ संस्थेच्या सुनिता वाधवान, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे ज्ञानेश्वर गुरव, ओशोधारा संघ नागपूरचे संजय कटकमवार, महेंद्र नागपाल, सहजयोग ध्यान केंद्राचे महेश धांदेकर, सागर शिंदे, प्रदीप नवारे, आदित्य पैदलवार, प्रतीक आग्रे, अमित योगासन मंडळाचे संदेश खरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व विविध योग संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाला होणारी गर्दी विचारात घेता योग संस्थांचे प्रतिनिधी, योग साधकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता विश्व योग दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. महापौर नंदा जिचकार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवितील.श्वेत गणवेशात दिसणार योग साधकयोग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांना मैदानात मुख्य द्वारातून प्रवेश करावा लागणार आहे. यानंतर स्टेडियमवर जाण्यासाठी प्रवेशद्वार क्रमांक २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११ आणि १४ मधून प्रवेश करता येईल. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व योगसाधकांनी श्वेत गणवेश परिधान करून यावे, असे आवाहन नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :YogaयोगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका