शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विसर्जन बंदोबस्ताची नागपूर पोलिसांकडून तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:31 IST

लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ येऊ लागल्याने पोलिसांनीही विसर्जन बंदोबस्ताची तयारी केली आहे. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या आणि ५७५ होमगार्डस्सह अडीच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ येऊ लागल्याने पोलिसांनीही विसर्जन बंदोबस्ताची तयारी केली आहे. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या आणि ५७५ होमगार्डस्सह अडीच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलाने तयारी केली आहे. महापालिकेच्या मदतीने शहरात जागोजागी कृत्रिम टॅन्क निर्माण करून तेथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक गणपती जास्तीत जास्त प्रमाणात फुटाळा तलावात विसर्जित करण्यात येतात. त्यामुळे फुटाळावरही पोलिसांनी तयारी केली आहे. शिवाय शहराच्या विविध भागातून येणाऱ्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. १ आणि २ सप्टेंबरला पोलिसांचा बंदोबस्त राहील. त्यासाठी सात डीसीपी, ११ एसीपी आणि ६४ पोलीस निरीक्षक बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या सोबतीला १८५ सहायक आणि उपनिरीक्षक, १५८१ पोलीस कर्मचारी तसेच ५७५ होमगार्ड राहणार आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या बंदोबस्त सांभाळणार असून शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, वज्र वरुण असे सर्व तयार ठेवण्यात येणार आहे.१ आणि २ सप्टेंबरला शहरातील काही भागातील मार्गावर वाहतूक बदल केला जाणार आहे.गणेश विसर्जनासाठी भाविकांची फुटाळा तलावाकडे जाताना रस्त्यावर गर्दी होऊ नये आणि त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून वाहतूक वळविली आहे. त्यानुसार पूर्व नागपुरातून येणाऱ्या वाहनांसाठी सेंट्रल एव्हेन्यू, जयस्तंभ चौक, एलआयसी चौक, सदर पोलीस स्टेशन, वेकोलि, दूध डेअरी आणि तेलंखेडी हनुमान मंदिर मार्गे फुटाळा असा मार्ग राहणार आहे.गणेशपेठ, मानस चौक, मॉरिस कॉलेज टी-पॉईंट, संविधान चौक, सदर पोलीस स्टेशन आणि पुढे फुटाळा.सीताबर्डीतुन व्हेरायटी चौक, महाराजबाग, रविनगर चौक, भरतनगर चौक, तेथून फुटाळा. वायुसेना कमांड प्रवेशद्वाराकडून फुटाळाकडे येणाºया मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुना अमरावती नाका ते फुटाळा चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीवर आवश्­यकतेनुसार निर्बंध घातले जाणार आहेत. अमरावतीकडून येणारी वाहतूक वाडी टी-पॉईंट, हिंगणा मार्गे वळविली जाणार असून, आवश्यकतेनुसार मारुती सेवा मोटर्स येथून वायुसेना मार्गे किंवा जुना अमरावती नाका चौक येथून उजवीकडे अंबाझरी मार्गे वाहतूक व्यवस्था वळविली जाणार आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिस