शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बहरला प्रेमाचा वसंत!

By admin | Updated: February 15, 2016 02:55 IST

खुल्लमखुल्ला प्रेम करण्यावर काही संघटनांनी लावलेली एकतर्फी सेन्सॉरशीप, कडेकोट बंदोबस्त आणि भिरभिरत्या ‘शोधक’ नजरा, अशा वातावरणात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचे तरुणाईसमोर आव्हान होते .

उपराजधानीत कडक पोलीस बंदोबस्त : सामाजिक उपक्रमांचा ‘व्हॅलेंटाईन डे’नागपूर : खुल्लमखुल्ला प्रेम करण्यावर काही संघटनांनी लावलेली एकतर्फी सेन्सॉरशीप, कडेकोट बंदोबस्त आणि भिरभिरत्या ‘शोधक’ नजरा, अशा वातावरणात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचे तरुणाईसमोर आव्हान होते . पण ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फुलविला. प्रेमाच्या बाबतीत ‘हुश्शार’ झालेल्या ‘यंगिस्तान’ने रविवारी भेटण्याचे कट्टेच बदलवले. कोणी शॉपिंग मॉलकडे मोर्चा वळविला तर कोणी आवडत्या रेस्टॉरेन्टकडे धाव घेतली. अनेकांनी नाहक मनस्ताप टाळण्यासाठी मोबाईल, फेसबुक व स्काईपचा आधार घेतला. अनेकजण तर अशा प्रकारे भेटले की इतरांना ते अनोळखीच वाटावे, पण नजरांतूनच प्रेमाची देवाणघेवाण झाली. केवळ प्रेमीयुगुलच नव्हे तर तरुणांच्या ग्रुप्सनेदेखील धमाल केली. कोणी ट्रॅफिक पार्कजवळ बसून निवांत चर्चा केली, तर कुणी बजाजनगरजवळ आपला कट्टा उभारला.यंदा गालबोट नाहीमागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता शहरातील उद्याने ओस पडली होती. बजरंग दलाने काल इशारा रॅली काढली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेमी युगुलांना संरक्षण पुरविण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नसती भानगड कशाला असा विचार करून तरुणाईने सार्वजनिक स्थळांवर जाऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा बेत रद्द केला. सायंकाळच्या सुमारास शहरातील तरुणाईच्या कट्ट्यांवर गर्दी व्हायला सुरुवात झाली.कडेकोट पोलीस बंदोबस्तमागील वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला झालेल्या गोंधळामुळे तणावाचे वातावरण होते. यंदा अशाप्रकारे कुठलीही घटना होऊ नये याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती. फुटाळा, महाराजबाग, ट्रॅफीक पार्क, सेमिनरी हिल्स या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. फुटाळ््यात दिवसभर ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले होते. तसेच ठराविक अंतरावर पोलीस दिसून येत होते. फुटाळ्यावर २११ तरुणांचे रक्तदानफुटाळा तलावावर फक्त तरुणाईची सामाजिक संवेदना पाहायला मिळाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरात २११ तरुणांनी रक्तदान केले. सकाळपासून सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते व तरुणांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. यासोबतच फुटाळ्यावर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. काही शाळकरी मुलांनी दुपारच्या सुमारास पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.बदललेले कट्टेदररोज रस्त्याच्या दुतर्फा आपले वाहन उभे करून गप्पा मारणाऱ्या तरुणाईने आज आपले कट्टे बदलवले होते. एरवी सेमिनरी हिल्स, महिला क्लब, अमरावती मार्ग या परिसरातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे प्रेमीयुगुल व तरुणांचे ग्रुप सिव्हिल लाईन्स, लक्ष्मीनगर, सुरेंद्रनगर, वर्धा रोड, आरपीटीएस, आयटी पार्क, शिवाजीनगर येथील शांत रस्त्यावर दिसून येत होती.बजरंग दलाने लावले गाढवांचे लग्न‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करण्याचा पवित्रा घेतलेल्या बजरंग दलातर्फे प्रेमीयुगुलांविरोधात आक्रमक प्रदर्शन करण्यात आले नाही. परंतु सकाळच्या सुमारास महाल येथील बडकस चौक परिसरात काही कार्यकर्त्यांनी गाढवांचे लग्न लावून ‘व्हॅलेंटाईन डे’चा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात घोषणा दिल्या व ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याचे आवाहन केले. शिवाय परिसरात या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी इशारा रॅली काढली होती. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त साधून नीलिमा हारोडे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले. प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकूडकर यांच्या ‘जहर खाऊ नका’ या अभियानाला साहाय्य करीत त्यांनी मौदा तालुक्यातील धानला गावातील तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रकमेची मदत केली. (अधिक वृत्त/२)