लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाठग प्रीती दास हिने तिच्या एका वर्ध्याच्या मित्रालाही ठगविल्याचे उघड झाले आहे. नवल राधेश्याम पांडे (वय २९) नामक तरुणाने आज प्रीतीविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यावरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.ठगबाज प्रीतीविरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. प्रीतीने नवल पांडे याच्यासोबत मैत्री करून त्याला त्याची संपूर्ण माहिती विचारली. नंतर त्याला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून वर्षभरापूर्वी दीड लाख रुपये घेतले. काही दिवसांनी प्रीतीचे वर्तन लक्षात आल्यामुळे आणि नोकरी लावून देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे नवलेने तिला आपली रक्कम परत मागितली. त्याने तिच्या मागे तगादा लावल्यामुळे तिने त्याला ३० हजार रुपये परत केले. मात्र एक लाख २० हजार रुपये देण्यास टाळाटाळ करीत होती. प्रीतीविरुद्ध नागपुरात गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त कळाल्यानंतर नवलने सीताबर्डी पोलिस ठाण्यात येऊन शनिवारी आपली तक्रार नोंदविली. त्यामुळे पोलिसांनी प्रीती दासविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपूरच्या प्रीतीने वर्ध्याच्या मित्रालाही ठगविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 23:42 IST
महाठग प्रीती दास हिने तिच्या एका वर्ध्याच्या मित्रालाही ठगविल्याचे उघड झाले आहे. नवल राधेश्याम पांडे (वय २९) नामक तरुणाने आज प्रीतीविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यावरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपूरच्या प्रीतीने वर्ध्याच्या मित्रालाही ठगविले
ठळक मुद्देदीड लाख रुपये हडपले, नोकरी दिलीच नाही : सीताबर्डीत गुन्हा दाखल