शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतीने घातली पन्नास लाखांची टोपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:20 IST

कुख्यात प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा हिने आपल्याला ४९ ते ५० लाख रुपयांनी गंडविले, असा तक्रार अर्ज इर्शाद नामक व्यक्तीने आज पाचपावली पोलिस ठाण्यात दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीच्या चौकशीत थेट लक्ष घालणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रीती दासची पोलीस कोठडीही तीन दिवसांनी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा हिने आपल्याला ४९ ते ५० लाख रुपयांनी गंडविले, असा तक्रार अर्ज इर्शाद नामक व्यक्तीने आज पाचपावली पोलिस ठाण्यात दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीच्या चौकशीत थेट लक्ष घालणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रीती दासची पोलीस कोठडीही तीन दिवसांनी वाढली आहे. तिला आज न्यायालयाने २० जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.कुख्यात प्रीती ही एका फसवणूक प्रकरणात अडकली होती. त्यावेळी बँक कन्सल्टंट आणि रिकव्हरी एजंट म्हणून काम करणाºया इर्शादसोबत तिची ओळख झाली. प्रीतीने त्याच्यावर जाळे फेकून त्याच्याकडे जाणे-येणे सुरू केले. इर्शादच्या तक्रार अर्जानुसार प्रीतीने त्याच्याशी जवळीक साधून त्याचे व्यवहार हाती घेतले. बँकेत पैसे जमा करण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती करून घेतल्यानंतर तिने त्याची रक्कम हडपणे सुरू केले. एक दिवस आपली बँक खाती तपासली असता मला बँक खात्यात केवळ वीस हजार रुपये असल्याचे कळले. प्रीतीला याबाबत विचारणा केली असता तिने त्याला जास्त चौकशी केल्यास बलात्काराच्या आरोपात फसवीन, अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करणे सुरू केल्याचे इर्शादने आज पाचपावली पोलिसांना सांगितल्याचे समजते. या घडामोडीला पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान, पोलीस आयुक्त राहुल माकणीकर यांनी आज पाचपावली आणि लकडगंज पोलिसांकडून तपासाबाबत आतापर्यंत काय प्रगती झाली याबाबत माहिती जाणून घेतली. यापुढे कोणता आणि कसा तपास करावा त्या संबंधातही दिशानिर्देश दिले. आजपासून या तपासावर आपणही नजर ठेवणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत'ला दिली.कुख्यात प्रीतीच्या संपर्कातील मंडळीची चौकशी सुरूप्रीती दास हिच्या संपर्कात असलेल्या मंडळीची यादी पोलिसांनी तयार केली असून ते प्रीतीच्या वारंवार का संपर्कात होते, याची पोलीस चौकशी करीत आहेत. आज पाचपावली पोलिसांनी रवी घाडगे पाटील नामक तरुणाची चौकशी केली.विशेष तपास पथकाची मागणीदरम्यान, प्रीतीविरुद्ध शेकडो तक्रारदार तक्रारी करण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दडपण आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रीती दासच्या गुन्ह्यांची चौकशी करण्याकरिता स्वतंत्र तपास पथक निर्माण करावे, अशी भावना लोकांची झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी