शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पावसाळ्याआधीची खबरदारी; नागपुरातील नद्यांची साफसफाई सुरू

By मंगेश व्यवहारे | Updated: May 10, 2023 16:55 IST

Nagpur News यंदा शहरातील नद्यांच्या स्वच्छतेला उशिराच सुरुवात झाली. नागनदी, पोहरा नदी व पिवळी नदी स्वच्छतेसाठी महापालिकेने १२ भाग केले आहेत.

मंगेश व्यवहारेनागपूर : यंदा शहरातील नद्यांच्या स्वच्छतेला उशिराच सुरुवात झाली. नागनदी, पोहरा नदी व पिवळी नदी स्वच्छतेसाठी महापालिकेने १२ भाग केले आहेत. त्या १२ पैकी ९ भागात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या स्वच्छतेवरही परिणाम झाला आहे.

२०१३ मध्ये लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. यंदा महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने नद्या स्वच्छतेची चळवळ होऊ शकली नाही. त्यातच नद्यांच्या स्वच्छतेसाठी उशीरही झाला. नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ०.८ ते १.५ लक्ष मेट्रिक टन गाळ काढण्यात येतो. यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत वाढलेली हिरवळ, गवत तसेच गाळ काढून नद्यांची रुंदी व खोली स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येईल.

नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून सुरक्षा प्रदान होईल. स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच नदीमधून काढण्यात येणाऱ्या मातीचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शहरातून वाहणाऱ्या नाग नदीची लांबी १७.४ किमी, पिवळी नदीची लांबी १६.४ आणि पोहरा नदीची लांबी १३.१२ किमी आहे. १२ भागात स्वच्छता केली जाणार आहे.

टॅग्स :riverनदीNaag Riverनाग नदी