शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्रतापनगर, जरीपटक्यात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:52 IST

शहरात चोर, लुटारू कमालीचे सक्रिय झाले असून, गुन्हेगारांनी घातलेल्या हैदोसामुळे नागपूरकर अस्वस्थ झाले आहेत. प्रतापनगरात दोन दिवसात चार चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. एवढेच काय, चोरट्यांनी प्रतापनगरातील एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलच्या निवासस्थानाचे दार तोडून आत प्रवेश केला आणि रोख तसेच हिऱ्याच्या अंगठीसह पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. तर, जरीपटक्यातून रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. गेल्या २४ तासात हे दोन्ही गुन्हे नोंदले गेले.

ठळक मुद्देलेफ्टनंट कर्नलचे दार तोडले : हिरेजडित रिंग, रोख आणि दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात चोर, लुटारू कमालीचे सक्रिय झाले असून, गुन्हेगारांनी घातलेल्या हैदोसामुळे नागपूरकर अस्वस्थ झाले आहेत. प्रतापनगरात दोन दिवसात चार चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. एवढेच काय, चोरट्यांनी प्रतापनगरातील एका निवृत्त लेफ्टनंट कर्नलच्या निवासस्थानाचे दार तोडून आत प्रवेश केला आणि रोख तसेच हिऱ्याच्या अंगठीसह पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. तर, जरीपटक्यातून रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. गेल्या २४ तासात हे दोन्ही गुन्हे नोंदले गेले.प्रतापनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवदत्त निवास, दीनदयालनगरात राहणारे रवींद्र वसंतराव थोडगे हे लेफ्टनंट कर्नल होते. दिल्लीहून निवृत्त झाल्यानंतर ते नागपुरात आले. ४ मेच्या सकाळी ते धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सपत्नीक हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते. ही संधी साधून चोरटे त्यांच्या निवासस्थानाच्या पहिल्या माळ्यावर मागच्या बाजूने चढले. त्यांनी गॅलरीच्या बाजूचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शयनकक्षातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी हिºयाची रिंग, सोन्याचे दागिने तसेच ५० हजारांची रोकड असा एकूण ४ लाख ७१ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी ही धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्रतापनगर पोलिसांसह वरिष्ठही घटनास्थळी पोहचले. त्यांनी चोराचा माग काढण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोडगे यांच्याकडे सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांची गोची झाली. दुष्यंत नारायणराव देशपांडे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.जरीपटक्यात वृद्धेकडे घरफोडीमुलीच्या गावाला गेलेल्या एका वृद्धेच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ एप्रिल ते ५ मे च्या दरम्यान ही धाडसी घरफोडीची घटना घडली. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.जमनाबाई गंगाराम श्रीवास (वय ८०) या जरीपटक्यातील विश्वासनगरात गल्ली नंबर ५ मध्ये राहतात. १८ एप्रिलला दुपारी त्या बालाघाटमध्ये राहणाऱ्या मुलीच्या घरी गेल्या. रविवारी परत आल्या असता त्यांना दाराचे कुलूप तोडून दिसले. चोरट्यांनी घरातील रोख ५० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख, ७३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे जमनाबाईंच्या लक्षात आले. चोरट्यांनी चोरी करताना घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त केले. धाडसी घरफोडीची ही घटना उजेडात आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर