शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘अरे हट’, ‘अरे चल’ अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’; विधान परिषदेत लाड, दटके व वंजारी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 05:26 IST

विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना मुख्यमंत्री हेदेखील सभागृहात उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर: विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेतील सदस्यांच्या वर्तणुकीवरून यंदा उपसभापतींनी वारंवार चिंता व्यक्त केली. परंतु, बुधवारी सदस्यांच्या भाषेचा स्तर आणखी खाली गेल्याचे दिसून आले. राज्याबाहेर उद्योग गेल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले अन् सत्ताधारी बाकांवरील प्रसाद लाड, प्रवीण दटके व विरोधी बाकांवरील अभिजित वंजारी यांनी अक्षरश: अरेरावीची भाषा वापरली. या शाब्दिक वादात ‘अबे हट’ अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’ अशा आशयाचे शब्द इतर सदस्यांना ऐकावे लागले. 

उपसभापतींच्या मध्यस्थीनंतर सदस्य शांत झाले. नियम ९३ अन्वये वंजारी यांनी राज्यातून बाहेरील राज्यात गेलेल्या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला. यावर उद्योगमंत्र्यांनी लेखी निवेदन दिले. त्यावर उपप्रश्न विचारत असताना वंजारी यांनी गुजरातमध्ये भाजपला जिंकविण्यात राज्य शासनाचा मोठा हातभार होता व येथील प्रकल्प तिकडे गेल्यामुळेच त्यांच्या पक्षाला फायदा झाला असे वक्तव्य केले. 

‘हट...हट’ वरून झाली सुरुवात

प्रसाद लाड व प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला, तर वंजारीदेखील आक्रमक झाले. लाड यांनी हातवारे करत ‘हट हट’ असे म्हणण्यास सुरुवात केली. यावरून वंजारी यांनीदेखील ‘अरे हट’, ‘अरे चल’, अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’ अशा भाषेचा उपयोग केला. वाद वाढत असल्याचे दिसताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना खाली बसण्याचे निर्देश दिले. 

सभागृहात मारामारी करत आहात का?

- उपसभापतींनी या मुद्द्यावरून लाड व वंजारी यांचे कान टोचले. लाड, तुमची बोलण्याची पद्धत योग्य नाही. 

-  तसेच वंजारी, तुम्ही सूचनेच्या ‘स्कोप’मध्ये बोला. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. अशी भाषा वापरून सभागृहात मारामारी करत आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

- विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना मुख्यमंत्री हेदेखील सभागृहात उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन