शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

बाबा, तुम्ही चुकलात; प्रणवदांच्या लेकीने सांगितला RSS भेटीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 08:31 IST

संघ तुमच्या भाषणातील विचार पुसून टाकेल आणि चुकीच्या गोष्टी पसरवेल.

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या भाषणातील विचार पूर्णपणे बाजूला सारून केवळ तुमच्या प्रतिमेचा वापर करून खोटा प्रचार करेल, असा इशारा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे.काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी नागपुरात पोहोचले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप होणार असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते RSS च्या स्वयंसेवकांना संबोधितही करतील. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, प्रणव मुखर्जी आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. यावरून शर्मिष्ठा मुखर्जी यांनी बुधवारी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली.गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमे भाजपाच्या सूत्रांच्या हवाल्याने शर्मिष्ठा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देत आहेत. हाच धागा पकडत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले की, नुकत्यात घडलेल्या घटना पाहता तुम्हाला भाजपाच्या गलिच्छ प्रचार यंत्रणेविषयी अंदाज आलाच असेल. तुम्ही भाषणात कधीही संघाच्या विचारांचे समर्थन करणार नाहीत, हे त्यांनादेखील चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तुमच्या भाषणातील विचार बाजूला सारले जातील. केवळ तुमच्या संघाच्या व्यासपीठावरील छायाचित्रांचा वापर करून खोटी विधाने पसरवली जातील. तुम्ही नागपूरमध्ये संघाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना अपप्रचार करण्यासाठी आयते कोलीत दिले आहे. ही तर केवळ सुरुवात आहे, असा इशारा शर्मिष्ठा यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रणव मुखर्जी आज संघाच्या व्यासपीठावरून काय बोलणार, याबद्दलची सर्वांचीच उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 

 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliticsराजकारण