शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटीने विकसित केले पीपीई किट निर्जंतुकीकरण युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:09 IST

व्हीएनआयटीने पीपीई किट, मास्क, अ‍ॅप्रॉन, ग्लोव्हज इत्यादी सुरक्षा साधनांच्या निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझेशन युनिट विकसित केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाविरु द्ध लढा : एम्सला दोन युनिट हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : व्हीएनआयटीने पीपीई किट, मास्क, अ‍ॅप्रॉन, ग्लोव्हज इत्यादी सुरक्षा साधनांच्या निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझेशन युनिट विकसित केले आहे. या युनिटमध्ये आरोग्य सेवकांच्या सुरक्षा साधनांचे अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशनद्वारे निर्जंतुकीकरण होते. मंगळवारी एम्सला कोरोनाविरुद्ध लढण्याकरिता दोन युनिट हस्तांतरित करण्यात आले.प्रा. किशोर भुरचंदानी, डॉ. प्रभात शर्मा, डॉ. दीप गुप्ता, सुधीरकुमार सिंग, श्रवणकुमार, रविशकुमार वर्मा व मनोज हाते यांनी या युनिटची निर्मिती करताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर्स व अन्य आरोग्य सेवकांच्या पीपीई किट, मास्क, अ‍ॅप्रॉन, ग्लोव्हज इत्यादी सुरक्षा साधनांच्या निर्जंतुकीकरणाकरिता यंत्राची गरज होती. ती बाब लक्षात घेता हे युनिट तयार करण्यात आले. व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी. एम. पडोळे यांनी गेल्या २५ एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक आणि अभियंते अल्ट्रा व्हायोलेट सॅनिटायझर मॉडेलची निर्मिती करीत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हे मॉडेल युद्धस्तरावर काम करून ४ मे रोजी पूर्ण करण्यात आले. मॉडेलचे डिझाईन तयार करणे, त्याची तपासणी करणे इत्यादी कामे केवळ आठ दिवसात पूर्ण करण्यात आली. हे युनिट आपोआप चालणारे आहे. त्यामुळे युनिट हाताळण्याकरिता विशेष कौशल्याची गरज नाही. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्रांमध्ये असलेली तांत्रिक अचूकता या युनिटमध्ये आहे.व्हीएनआयटी येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. पी. एम. पडोळे यांनी हे युनिट एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता यांना प्रदान केले. दरम्यान, या दोघांनी यासंदर्भातील एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही युनिट सर्वांसमक्ष कार्यान्वित करून दाखविण्यात आले. याप्रसंगी प्रा. व्ही. बी. बोरघाटे, प्रा. जस्टीन भट, डॉ. मृणाल पाठक, डॉ. संजीव चौधरी, डॉ. प्रथमेश कांबळे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस