शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार ऊर्जा पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 21:41 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत कोराडी येथे ऊर्जा पार्क स्थापित करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देनागरिकांना मिळणार वीज उत्पादनपारेषण व वितरणाची माहितीअर्थसंकल्पात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे ऊर्जा पार्क तयार करण्याची घोषणा करीत नागपूरला अनोखी भेट दिली आहे. महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात साकार होणारा हा पार्क आगळावेगळा असेल. येथे लोकांना वीज तयार कशी होते याची माहिती मिळेल. इतकेच नव्हे तर ट्रान्समिशन लाईनद्वारे ती लोकांच्या घरापर्यंत कशी पोहोचते याची इत्थंभूत माहिती उपलब्ध होईल.शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत कोराडी येथे ऊर्जा पार्क स्थापित करण्याची घोषणा केली. ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची ही संकल्पना आहे. याबाबत पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, हे पार्क आकर्षणाचे केंद्र ठरेल. कोराडी येथील देवीच्या मंदिरात लाखो भक्त दर्शनाला येतात. लागूनच असलेल्या वीज केंद्राला पाहून त्यांच्या मनात वीज कशी तयार होत असेल याचे कुतूहल निर्माण होते. नागरिकांचे हे कुतूहल दूर करण्याचे काम हे पार्क करेल. नागरिकांना येथे वीज बचतीचा संदेशही दिला जाईल. राऊत म्हणाले, वीज केंद्र संवेदनशील ठिकाण असते. सुरक्षा कारणांमुळे येथे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. परंतु ऊर्जा पार्क साकार झाल्यानंतर नागरिक येथे विजेचे उत्पादन, पारेषण व वितरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतील. महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या जागेवर हे पार्क साकार होईल. याला साकार करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात प्रधान सचिव (ऊर्जा), असीम गुप्ता, महाजेनकोचे प्रबंध निदेशक शैला ए, खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, मुख्य अभियंता अनंत देवतारे व आर्किटेक्ट अशोक मोठा प्रयत्नरत आहेत.

वीज केंद्रांचे मॉडेल ठरणार आकर्षणाचे केंद्रऊर्जा पार्कमध्ये कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मॉडेल तयार केले जाईल. यासोबतच वीज प्रकल्प, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व गॅस आधारीत वीज उत्पादन प्रकल्पांचे मॉडेल तयार केले जातील. येथे विविध स्त्रोतांच्या माध्यमातून वीज कशी तयार केली जाते, ती लोकांपर्यंत कशी पोहोचते, याची माहिती सोप्या शब्दात दिली जाईल.आणखी काय मिळाले- नागनदीमध्ये ६० टक्के दूषित पाणी सोडले जाते. यामुळे नदीच्या आजूबाजूला दुर्गंधी राहते. अर्थसंकल्पात नदी स्वच्छ करण्याच्या कामाला पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.- उत्तर नागपुरात प्रस्तावित शासकीय इंजिनियरिंग कॉलेजनंतर मिहानमध्ये स्थापित करण्यात आले. अर्थसंकल्पात या कॉलेजला उत्कृष्ट केंद्र बनवण्याची घोषणा करण्यात आली.- इंदोरा येथे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या संकल्पनेने साकर होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या केंद्रात सभागृह, वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ ठेवण्यासाठी हॉल, बँक काऊंटर, अतिथीगृह बनवण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार