शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नागपुरात बुधवारी अनेक भागातील वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 20:18 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील खांब हटवणार, दुरुस्तीची कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे. यादरम्यान महाल आणि गांधीबाग विभाग सर्वाधिक प्रभावित राहतील.महावितरणनुसार २२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत गांधीबाग डिव्हिजनमधील हरपूरनगर, ताजनगर, आदर्शनगर, गुर्जर कॉलनी, गायत्रीनगर, बगडगंज, रतन कॉलनी, गौसिया कॉलनी, सर्वश्रीनगर, बेलदारनगर, रामकृष्णनगर, गोविंदप्रभुनगर, एमजीनगर, योगेश्वरनगर, जीजामातानगर, म्हाळगीनगर, गंजीपेठ, भालदारपुरा, आर्य समाज मंदिर परिसर, लोहारपुरा, शब्बानी क्लब, तिडके भवन, टाटा पारसी, नटराज चौक, जुनी हिस्लॉप गल्ली आदी ठिकाणी वीज पुरवठा होणार नाही. याच कालावधीत महालडिव्हिजनमधील चंद्रमणीनगर, जोशीवाडी, कुकडे ले-आऊट, त्रिशरण चौक, विश्वकर्मानगर, रामेश्वरी, हावरापेठ, द्वारकापुरी, गजानननगर, बाभुळखेडा, पार्वतीनगर, कौशल्यानगर, जयभीमनगर, जोगीनगर, भीमनगर, काशीनगर, रुक्मिणीनगर, रघुजीनगर, म्हाडा सिटी, रेशीमबाग, सिरसपेठ, दक्षिणामूर्ती चौक, बडकस चौक, जलालपुरा, रुईकर रोड, चित्रा टॉकीज, चितारओळी, चिटणीस पार्क या भागात वीज पुरवठा होणार नाही. सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळात भांडेप्लॉट, नंदनवन, मिरे ले-आऊट, बापूनगर, गुरुदेवनगर, ओमनगर, हसनबाग, पांडव महाविद्यालय, महिला महाविद्यालय, उंटखाना, राजधानी हाईट्स, मेडिकल चौक, हनुमाननगर, चंदननगर, राजाबाक्षा, रामबाग, जाटतरोडी, बारा सिंगल, पटेल चौक, अशोकनगर, व्यंकटेशनगर, नंदनवन झोपडपट्टी, राजेंद्रनगर, हसनबाग, संजय गांधीनगर, सद्भावनानगर, दर्शन कॉलनी, अब्बुमियाँनगर, सूरजनगर, तुळशीनगर, अंतुजीनगर, पवनशक्तिनगर, खंडवानीनगर, जानकीनगर, शिवशक्तीनगर, अमरनगर, महाकालीनगर, विठ्ठलनगर, चक्रपाणीनगर येथील वीज पुरवठा बंद राहील.चिचोली, चनकापूरही प्रभावितग्रामीण भागातील सावनेर डिव्हिजन अंतर्गत कळमेश्वर उपविभागातील खापरखेडा वीज लाईनच्या दुरुस्तीचे कामही २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत चिचोली व चनकापूर या गावातील वीज पुरवठा खंडित राहील.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनnagpurनागपूर