नागपूर: विदर्भातील कडाक्याचा उन्हाळा लक्षात घेता, वीज ग्राहकांना ग्रीष्म ऋतूत अखंडित सेवा मिळावी यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. संभाव्य तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी उद्या, बुधवारी (८ एप्रिल) नागपूर शहरातील विविध विभागांमध्ये तातडीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामुळे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सकाळी काही तासांसाठी खंडित राहणार आहे.
शटडाऊन' नेमके कशासाठी?
उन्हाळ्यात ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्मर जळणे किंवा केबलमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी नवीन एबी स्विच बसवणे, ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे.
कुठे आणि कधी असेल वीज बंद?
काँग्रेस नगर विभाग:
सकाळी ७ ते १०: इटरनिटी मॉल, सेंट्रल मॉल, व्हीआयपी रोड, काचीपुरा.सकाळी ८ ते ११: मनीष लेआउट, गायत्री नगर, लोकसेवा नगर, परसोडी, हनुमान मंदिर परिसर.सकाळी ९ ते १२: नेल्को सोसायटी, सुमित नगर, अध्यापक लेआउट, आझाद हिंद नगर.सकाळी ८ ते १२: जयप्रकाश नगर, सीता नगर, महालक्ष्मी मंदिर परिसर.
महाल विभाग:
सकाळी ७:३० ते १२:३०: अयोध्या नगर, उदय नगर चौक, साई मंदिर परिसर.सकाळी ९ ते दुपारी १:३०: मेडिकल चौक, रामबाग कॉलनी, जाटतरोडी, टी.बी. वार्ड परिसर, ओंकार नगर, गजानन नगर.
बुटीबोरी व इतर:
सकाळी ७ ते १२: काचीमेट, शांतीनगर, संत जगनाडे नगर.सकाळी १० पासून: एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, रिलायन्स सिमेंट, ईशान कास्टींग.महावितरणने या नियोजित कामामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : Nagpur residents will face power outages on Wednesday, April 8th, due to urgent maintenance. Areas like Congress Nagar, Mahal, and Butibori will experience disruptions. Mahavitaran apologizes for the inconvenience, citing essential repairs to prevent summer overloads and ensure reliable service.
Web Summary : नागपुर के निवासियों को 8 अप्रैल, बुधवार को बिजली कटौती का सामना करना पड़ेगा। कांग्रेस नगर, महाल और बुटीबोरी जैसे क्षेत्रों में व्यवधान होगा। महावितरण ने असुविधा के लिए खेद जताया, गर्मियों में ओवरलोड को रोकने और विश्वसनीय सेवा सुनिश्चित करने के लिए आवश्यक मरम्मत का हवाला दिया।