शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२३ पासून वीजग्राहक मेळावे : महावितरण साधणार नागरिकांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 21:35 IST

सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडळ अंतर्गत सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत. येत्या २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्देमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर परिमंडळ अंतर्गत सर्व उपविभाग कार्यालयांमध्ये वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजित करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत. येत्या २३ जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काँग्रेसनगर या विभागांतर्गत असलेल्या उपविभागीय कार्यालयांमध्ये २३ जुलैपासून दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबिल दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधित तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील.काँग्रेसनगर विभागांतर्गत येणाऱ्या हुडकेश्वर उपविभागातील खरबी वितरण केंद्रातील मेळावा २३ जुलै रोजी ३३ के.व्ही.वीज उपकेंद्रात, हुडकेश्वर वितरण केंद्रातील मेळावा २५ जुलै रोजी पिपळा ग्राम पंचायत कार्यालय, बेसा वितरण केंद्रातील मेळावा त्याच ठिकाणी २६ जुलै रोजी होणार आहे. त्रिमूर्तीनगर उप विभागातील मेळावा भगवती सभागृहात २५ जुलै रोजी तर शंकरनगर उपविभागातील मेळावा राणी लक्ष्मीबाई सभागृहात २६ जुलै रोजी होणार आहे. रिजन्ट उपविभागातील वीज ग्राहकांचा मेळावा साईकृपा मंगल कार्यालय येथे २९ जुलै रोजी होईल.उमरेड विभागातील पाचगाव येथे २३ जुलै रोजी मेळावा होणार आहे. उमरेड तालुक्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी २५ जुलै रोजी उमरेड येथे, ३१ जुलै रोजी सिर्सीला आणि ३ ऑगस्ट रोजी बेला येथे मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. २४ जुलै रोजी कुही उपविभागात येणाऱ्या मांढळ येथे ३० जुलै रोजी तर वेलतूर येथे २ ऑगस्ट रोजी मेळावा होणार आहे. भिवापूर उपविभागातील वीज ग्राहकांच्या मेळावा २६ जुलै रोजी होईल. याच उपविभागात येणाऱ्या जावळी येथे १ ऑगस्ट, नांद येथे २९ जुलै रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.मुख्य अभियंता दिलीप घुगल तसेच अधीक्षक अभियंता दिलीप दोडके हे स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन वीजग्राहकांशी थेट संवाद साधतील.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणconsumerग्राहक