शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

सत्ता आली पण कार्यकर्त्यांचे काय ?

By admin | Updated: June 21, 2015 02:51 IST

भाजपचे संघर्षाचे दिवस गेले. सत्तेचे ‘अच्छे दिन आले’. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली.

भाजप शहर कार्यकारिणीची आज बैठक कमलेश वानखेडे  नागपूर भाजपचे संघर्षाचे दिवस गेले. सत्तेचे ‘अच्छे दिन आले’. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता आली. पक्षाचा झेंडा खाद्यांवर घेऊन फिरणारा सामान्य कार्यकर्ता खरच समाधानी आहे का, त्याची चार कामे होत आहेत का, की कार्यकर्त्यांच्या नावावर एजंटांची कामे होत आहेत ? पक्षासाठी चटई उचलणारे वंचित अन ‘चटई क्षेत्र’वाले लाभार्थी असे तर होत नाही ना ! लाट पाहून पक्षात आलेल्यांना समोरची खुर्ची अन पडत्या काळात अनेक लाटांना सामोरे जाणारा कार्यकर्ता मागे गर्दीत चेपला जात आहे. यावर नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सामान्य कार्यकर्ता पक्षापासून तुटला, दुखावला, दुरावला तर भाजपचीही काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. तब्बल वर्षभरानंतर भाजपाच्या शहर कार्यकारिणीची बैठक आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता हनुमान नगरातील संत रविदास सभागृहात होत आहे. तसे तर शहर कार्यकारिणीची बैठक तीन महिन्यातून एकदा होणे अपेक्षित आहे. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची धामधूम व त्यांनतर पक्षाने दिलेले कार्यक्रम राबविताना कदाचित शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांना कार्यकारिणी घेण्यासाठी पुरेसी सवड मिळाली नसेल. कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने का होईना, सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. गेली १५ वर्षे भाजप राज्यात, केंद्रात सत्तेत नव्हती. त्या वेळी या कार्यकर्त्यांनी पक्षाकडून कसलीही अपेक्षा केली नाही.पराभव पचवित पुन्हा नव्या दमाने पक्षाचा झेंडा उंचावून धरण्याचे काम केले. विरोधकांचे नारे ऐकून ते खचले नाहीत. आता खालून वरपर्यंत सत्ता आहे. पण या सत्तेसाठी झटणारा कार्यकर्ता मनातून खूश आहे का, नेत्यांकडून त्याची आस्थेने विचारणा होत आहे का, की तोच पक्षासाठी अनोळखी ठरू लागला आहे, या सर्व प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. सत्तेचा हा काळ कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणारा ठरेल की फक्त निवडक खुशमस्कऱ्यांची झोळी भरणारा यावरही विचार करावा लागेल. एकवेळ गडकरी, फडणवीस गर्दीत दिसलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याकडे पाहून स्मितहास्य करतात. जमलेच तर हात दाखवतात. नेत्यांकडून दाखविली जाणारी एवढी ओळखही कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरते. एक वेगळेच समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकते. पण शहर व जिल्ह्यातील काही आमदार तर जवळून जाणाऱ्या कार्यकर्त्याला विचारायलाही तयार नाही. काही नगरसेवक तर मंत्र्यांसारखे वागतात. घरी अडचणी घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावतात. नेत्यांना डोक्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्याची अशीच घुसमट होत राहिली तर तब्बल ११ आमदारांची टीम निवडून देणाऱ्या कार्यकर्त्यांना एकएकाला ‘आऊट’ करायला आणि महापालिकेतही सत्तेपासून खाली खेचायला वेळ लागणार नाही.