शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनमधील नवीन व्हिजिटिंग लेक्चरर भरतीला स्थगिती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 18, 2024 18:10 IST

हायकोर्टाचा आदेश : जुन्या व्हिजिटिंग लेक्चररचा नवीन भरतीला विरोध

राकेश घानोडेनागपूर : राज्यातील विविध शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील नवीन व्हिजिटिंग लेक्चरर भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. या न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय भरती प्रक्रिया पूर्ण करू नका, असा आदेश राज्य सरकारला देण्यात आला.

प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुरुषोत्तम बाहेतवार यांच्यासह १४३ जुन्या व्हिजिटिंग लेक्चररनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सेवेत नियमित करण्याची मागणी केली आहे. ते राज्यातील विविध शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये सेवा देत आहेत. त्यांचा नवीन व्हिजिटिंग लेक्चरर भरतीला विरोध आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने २०२३ मध्येही व्हिजिटिंग लेक्चररची भरती काढली होती. १० ऑगस्ट २०२३ रोजी उच्च न्यायालयाने या याचिकेमुळे नवीन व्हिजिटिंग लेक्चररना नियुक्तीचे आदेश जारी करण्यास मनाई केली होती. तो आदेश आतापर्यंत कायम आहे. असे असताना संचालनालयाने पुन्हा नवीन भरती प्रक्रिया सुरू केली होती. काही ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या गेल्या. याचिकाकर्त्यांनी ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे न्यायालयाने वरील अंतरिम आदेश जारी करून पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी याचिकेवर येत्या ७ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली.

नियमित शिक्षकांची अनेक पदे रिक्तशासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची अनेक पदे दीर्घ काळापासून रिक्त आहेत. परंतु, राज्य सरकार ती पदे भरण्याकडे सतत दूर्लक्ष करीत आहे. त्याऐवजी व्हिजिटिंग लेक्चररची नियुक्ती केली जात आहे. याचिकाकर्ते तीन ते दहा वर्षांपासून नियमित शिक्षकांप्रमाणे पूर्ण वेळ सेवा देत आहेत. प्रशासकीय कामे सांभाळत आहेत. तंत्रनिकेतन महाविद्यालये त्यांच्या आधारावरच सुरू आहेत. असे असताना त्यांना फार कमी वेतन दिले जाते. त्यामुळे त्यांना सेवेत नियमित केल्याशिवाय नवीन व्हिजिटिंग लेक्चररची भरती करू नका, असे याचिकेत नमूद केले गेले आहे

टॅग्स :nagpurनागपूरMumbai High Courtमुंबई हायकोर्ट