शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

नागपुरात पोस्टर गँगची दहशत; गुन्हेगारी आणि फोटोसेशन व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:28 IST

नागपुरात गेल्या महिनाभरात प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद या तिघांची गुन्हेगारी लागोपाठ उघड झाली आहे. सारखी कार्यशैली आणि फसवणुकीची एकसारखीच पद्धत या तिघांनी अंगीकारली होती.

ठळक मुद्देसर्वत्र खळबळ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोस्टर गँगची गुन्हेगारी उघड झाल्यानंतर त्यांनी विशिष्ट हेतूने करून घेतलेले अनेकांसोबतचे फोटोसेशन व्हायरल झाले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या व्हायरल झालेल्या फोटोसेशनमुळे अनेकांचा बीपीही वाढला आहे.

नागपुरात गेल्या महिनाभरात प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद या तिघांची गुन्हेगारी लागोपाठ उघड झाली आहे. सारखी कार्यशैली आणि फसवणुकीची एकसारखीच पद्धत या तिघांनी अंगीकारली होती. एकीकडे समाजातील विविध मान्यवरांशी ओळख वाढवून, त्यांच्या कार्यक्रमात जाऊन, त्यांच्यासोबत फोटो काढून घ्यायचे. हे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून चमकोगिरी करायची आणि याच फोटोच्या आधारे प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत सलगी वाढवून आपले कथित सामाजिक वजन वाढवून घ्यायचे. हे वजन असहाय, निराधार व्यक्तींवर टाकून त्यांच्या मालमत्ता हडप करायच्या, त्यांना ब्लॅकमेल करायचे. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा धाक दाखवून पीडितांची मुस्कटदाबी करत कोट्यवधींची माया गोळा करायची, अशीच या तिघांची पद्धत होती.

नागपुरातच नव्हे, सर्वत्र प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद सारखे अनेक थंड डोक्याचे गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. गोरगरिबांची सेवा करण्याचा आव आणून ही मंडळी गोरगरिबांची पिळवणूक करीत आहे. आपले गुन्हेगारी साम्राज्य मोठे करण्यासाठी हे असले गुन्हेगार विविध पक्षांच्या नेत्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत घसट वाढवतात.

नेत्यांनी राहावे सावधअनेकदा अशा गुन्हेगारांसोबत हस्तांदोलन करताना किंवा त्यांच्यासोबत फोटो काढून घेताना बहुतांश नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नसते. ओळखीच्यासोबत आल्यामुळे हा आपलाच असावा, असे समजून ते त्याच्यासोबत फोटो काढून घेतात आणि नंतर त्या फोटोंचा बागुलबुवा होतो. या फोटोंचा वापर हे असले गुन्हेगार आपली दहशत निर्माण करण्यासाठी करतात, हे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे नेत्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी