शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टिम्स तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:46 IST

सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देसाध्या वेशात उभे राहणार पोलीस : सिग्नल तोडणाऱ्यांवर होईल कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.या पथकातील वाहतूक शाखेचे पोलीस साध्या वेशात शहरातील विविध सिग्नलच्या आजूबाजूला उभे राहणार आहेत. कोणत्याही दिशेने वाहन चालकाने सिग्नल तोडून पळण्याचा प्रयत्न केला तर समोर उभे असलेले हे साध्या वेशातील वाहतूक पोलीस त्याला अडवतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. एवढे करून वाहनचालकांने पोलिसांना चुकविले तर प्रत्येक सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनचालकाचा पत्ता शोधून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.सिग्नल जम्पिंगमुळे अनेकदा दोष नसलेल्या वाहनचालकांना किंवा पायी जाणाऱ्यांना अपघात होतो. अपघात घडविणारा पळून जातो किंवा त्यालाही अनेकदा गंभीर दुखापत होते किंवा कुणाचा जीवही जातो. अपघातामुळे संबंधितांच्या कुुटुंबीयांची न भरून निघणारी हानी होते. अनेकांना अपंगत्व येते. सिग्नल हा काही सेकंदच बंद असतो. तरीदेखिल बेशिस्त वाहनचालक काही क्षणांसाठी स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. असे होऊ नये, नागपूर शहर अपघातमुक्त शहर व्हावे आणि प्रत्येकालाच वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त लागावी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम आखली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी या पथकांनी सिग्नल तोडणाऱ्या १६२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. सिग्नल जम्पिंगचे प्रमाणे शून्य करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे वाहतूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्याची मदतपोलिसांना चकमा देऊन पळून गेलेल्यांच्या घरी जाऊन संबंधित वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. कुणी वाहनचालक वारंवार हा गुन्हा करत असेल तर त्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) पाठविला जाणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर