शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद तात्पुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:56 IST

उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना अशाच स्वरुपात पदोन्नती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देशहर आणि पूर्व आरटीओ कार्यालय : अडीच वर्षानंतर मिळाले तदर्थ स्वरुपातील अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना अशाच स्वरुपात पदोन्नती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नागपूर शहर प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर शहर व वर्धा आरटीओ आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येते. ही तिन्ही कार्यालये मिळून गट ‘अ’ ते ‘क’ची १७८ पदे मंजूर असताना १२२ पदेच भरण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ५६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे न भरताच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे व विनोद जाधव यांना अनुक्रमे नागपूर शहर व पूर्व नागपूर कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही पदोन्नती केवळ ११ महिन्यांची आहे. यात वेतनव्यतिरीक्त अन्य कोणतेही लाभ मिळणार नाहीत. यामुळे हे अधिकारी किती गंभीरतेने प्रशासकीय कामकाजात लक्ष देतील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अडीच वर्षापूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची बदली गोंदिया येथे झाल्यावर हे पद रिक्त होते. पूर्व नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भूयार यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु त्यांच्याकडे नंतर गडचिरोली आरटीओ कार्यालयाचाही भार देण्यात आल्याने कामाचा ताण वाढला होता. आता दोन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र ही पदोन्नती तात्पुरती असल्याने कामाचा ताण वाढणार की कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरटीओ वरिष्ठांमध्ये अशा स्वरुपातील पदोन्नतीला घेऊन नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर