शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

मेडिकलच्या पदव्युत्तर जागा वाढणार : डिप्लोमाच्या ३० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:22 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे (डिप्लोमा) रूपांतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा प्रस्ताव नुकताच ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’कडे पाठविण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजकडे डिप्लोमाच्या ३४ जागा आहेत. त्याचे रुपांतर झाल्यास १४३ वरून १७३ ‘पीजी’जागा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे‘डिप्लोमा’चे रूपांतर ‘पीजी’ जागांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे (डिप्लोमा) रूपांतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा प्रस्ताव नुकताच ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’कडे पाठविण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजकडे डिप्लोमाच्या ३४ जागा आहेत. त्याचे रुपांतर झाल्यास १४३ वरून १७३ ‘पीजी’जागा होण्याची शक्यता आहे.एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी एमडी, एमएस या अभ्यासक्रमाकडे कल असतो. परंतु या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा होते. मर्यादित जागा असल्याने त्यासाठी परीक्षेतील एकेका गुणांच्या फरकाने प्रवेश हुकतात. ज्यांना एमडी, एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही, त्यांना पदव्युत्तर पदविकेला (डिप्लोमा) प्रवेश घ्यावा लागतो. राज्यातील अनेक सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमडी, एमएसच्या पदव्युत्तर पदवी विविध विषयाच्या अभ्यासक्रमाच्या मोजक्याच जागा आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार ‘डिप्लोमा’ला प्रवेश दिला जातो. ‘डिप्लोमा’ अभ्यासक्रम दोन वर्षांचा तर ‘पीजी’ अभ्यासक्रम तीन वर्षांचा असतो. डिप्लोमाधारक विद्यार्थ्याला ‘एमसीआय’च्या नियमानुसार मेडिकल कॉलेजमध्ये ‘फॅकल्टी’ मिळत नाही. यामुळे अशा विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागात काम करावे लागते. परिणामी, शहरात पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर शहरात तर डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर ग्रामीणमध्ये आपली सेवा देत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी एमडी, एमएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचेही यावरून दिसून येते. ग्रामीण भागात डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उद्देशच मागे पडला आहे. यामुळे डिप्लोमा अभ्यासक्रमाचे रुपांतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याची मागणी देशभरातून होत होती. याशिवाय देशात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याचा प्रश्न होताच. त्यावर पर्याय म्हणून डिप्लोमाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांना ‘पीजी’ अभ्यासक्रमात रूपांतरित करण्याची ‘आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया’ने तयारी दर्शविली. राज्यात सुमारे १६ सरकारी मेडिकल कॉलेज आहेत. या सर्व मेडिकल कॉलेजेस्नी आपला प्रस्ताव ‘एमसीआय’कडे नुकताच सादर केला आहे.नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम एमडी, एमएसच्या राज्यात सर्वाधिक १४३ जागा आहेत. त्याशिवाय ३४ डिप्लोमाचा जागा आहेत. यातील ‘पीएसएम’ विभागातील डिप्लोमाचा चार जागांचा प्रस्ताव न गेल्याने डिप्लोमाच्या ३० जागांचे रूपांतर एमडी, एमएसमध्ये होणार आहे.

 

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStudentविद्यार्थी